Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील २५० एसटी बस वरील शासकीय जाहिराती काढल्या, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी.

अमरावती जिल्ह्यातील २५० एसटी बस वरील शासकीय जाहिराती काढल्या, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी.

32
0

आशाताई बच्छाव

IMG_20240319_203321.jpg

अमरावती जिल्ह्यातील २५० एसटी बस वरील शासकीय जाहिराती काढल्या, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी.
————
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी
१६मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर लगेच आदर्श आचारसंहिते अमलात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहेत. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एसटी बसेस वरील शासकीय जाहिराताचे फलक तातडीने काढण्याची कार्यवाही एसटी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. विभागातील २५०हुन अधिक बसेस वरील शासकीय जाहिराती काढण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी एसटी महामंडळाने खबरदारीची पावली उचलली आहे. एस टी महामंडळाच्या बसेस वर”निर्णय गतिमान महाराष्ट्र वेगवान”या राज्य शासनाच्या आणि अन्न राजकीय जाहिराती तात्काळ हटविण्याचा सूचना एसटी महामंडळाने विभागीय नियंत्रण तसेच एसटी आगार व्यवस्थापकांना दिल्या आहेत. देशात १८व्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होऊ नये या अनुषंगाने एसटी बसून राजकीय जाहिराती काढून टाकण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. राजकीय जाहिराता काढण्यास टाळाटाळ केल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी प्रत्येक स्तरावर घेण्यात यावी अशी सूचना महामंडळाने दिल्या होत्या. या अनुषंगाने अमरावती रा.प.म. विभागाचे विभाग नियंत्रण यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या ८ आगारातील३४३ एसटी बस वरील २५० बसेस वर असलेल्या शासकीय व राजकीय जाहीरताचे लावलेले फलक हटविण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशानुसार एसटी २५० बसेस वरील जाहिरातीचे फलक हटविलेले आहे. अशी माहिती आमच्या प्रतिनिधींना अमरावती विभाग नियंत्रक एसटी महामंडळाचे निलेश बेलसरे यांनी माहिती दिली आहे.

Previous articleवकिला विरुद्ध फसवणुकी गुन्हा; बार असोशियनआक्रमक, आयुक्तालयावर धडकले वकील.
Next articleलासलगाव शिवनदी व विंचूर लोणगंगा नदी संवर्धन प्रस्तावास शासनाची मान्यता
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here