• Home
  • ‘निसर्ग’चा फटका! मुंबई विमानतळ सात वाजेपर्यंत बंद

‘निसर्ग’चा फटका! मुंबई विमानतळ सात वाजेपर्यंत बंद

🛑 Nisarga Cyclone Impact: ‘निसर्ग’चा फटका! मुंबई विमानतळ सात वाजेपर्यंत बंद 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई : ⭕ महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर घोंगावत असलेल्या निसर्ग वादळामुळं निर्माण झालेली परिस्थिती पाहून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आलं आहे. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत इथून कोणतेही उड्डाण होणार नाही. (Mumbai Airport Stops Operations)

आणि परिसरात जोरदार वारे वाहत आहेत. अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. याच सोसाट्याच्या वाऱ्यामुळं मुंबई विमानतळावर आज उतरलेले फेडेक्स कंपनीचे मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरले. हे विमान बेंगळुरूहून आले होते. या घटनेत कुठलीही जीवितहानी नाही. आता विमान बाजूला करण्यात आलं आहे. मात्र, हा अपघात आणि एकूणच परिस्थिती लक्षात घेऊन अनुचित प्रकार टाळण्यासाठी विमानतळ प्राधिकरणानं तूर्त उड्डाणं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संध्याकाळी ७ नंतर परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचं समजतं.

दरम्यान, कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरून घोंगावत आलेले व रत्नागिरी, रायगडमध्ये बरेच नुकसान करणारे निसर्ग वादळ आता उत्तर महाराष्ट्राच्या दिशेनं सरकल्याची माहिती आहे. असं असलं तरी मुंबईचा धोका अद्याप कमी झालेला नाही. वादळानं दिशा बदलल्यानं मुंबईत वाऱ्या-पावसाचा जोर कमी झाला आहे. तर, नाशिकमध्ये पाऊस सुरू झाला आहे. हे वादळ पुढे कोणत्या दिशेनं मार्गक्रमण करणार, याकडं लक्ष लागलं आहे.

निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री

हे सातत्यानं प्रशासकीय यंत्रणांच्या संपर्कात आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मदत व बचावकार्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment