• Home
  • मालेगांव भागात पावसाला सुरुवात निसर्ग चक्रीवादळाचा सामना करायला प्रशासन सज्ज

मालेगांव भागात पावसाला सुरुवात निसर्ग चक्रीवादळाचा सामना करायला प्रशासन सज्ज

  • *मालेगांव भागात पावसाला सुरुवात निसर्ग चक्रीवादळाचा सामना करायला प्रशासन सज्ज*
    *मालेगांव,(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज)-* नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातल्या विविध भागात आज दुपारी तीन वाजेपासूनच पावसाला सुरुवात झालेली असून,जिल्ह्यातील येवला तालुक्याच्या अंदरसूल येथे पोल्ट्रीचे शेड उडून गेल्याने नुकसान झाले आहे.तर सप्तशृंगी गडावर दरड कोसळल्याचे वृत आहे.
    या पावसाबरोबरच निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मालेगांव महानगरपालिका व पोलिस प्रशासनाच्या वतीने हालचाली गतीमान करण्यात आल्या आहेत.नागरिकांनी या काळात सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा.नदीकिनारी,पडक्या घराजवळ,पत्र्याच्या शेडजवळ ,जुनाट झाडाजवळ,किंवा विजेच्या खांबाजवळ कुणीही थांबू नये असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.नागरिकांनी सतर्कता बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे असेही शेवटी प्रशासनाने जाहिर केले आहे
anews Banner

Leave A Comment