Home Breaking News नांदेड मध्ये उठले आज “कोरोनाचे वदळ” एकाच दिवसात 23 कोव्हिड रुग्णांची भर,...

नांदेड मध्ये उठले आज “कोरोनाचे वदळ” एकाच दिवसात 23 कोव्हिड रुग्णांची भर, तर त्यात तब्बल 8 बालकांचा समावेश

174
0

*नांदेड मध्ये उठले आज “कोरोनाचे वदळ” एकाच दिवसात 23 कोव्हिड रुग्णांची भर, तर त्यात तब्बल 8 बालकांचा समावेश*
*नांदेड, दि ३ ; राजेश एन भांगे*

नांदेड जिल्ह्यातील बुधवार दिनांक 3 जून 2020 रोजी प्राप्त झालेल्या एकूण 238 अहवालापैकी 193 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले व नवीन 23 रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 175 एवढी झाली आहे.

आज दिवसभरात प्राप्त झालेल्या 23 पॉझिटिव रुग्णांपैकी 1 महिला रुग्ण वय वर्ष 35 आमदापूर तालुका देगलुर जिल्हा नांदेड आणि मुखेड तालुक्यातील भेंडेगाव येथील 1 पुरुष रुग्ण वय वर्ष 21, व तसेच इतर 21 रुग्ण देगलूर नाका व शिवाजीनगर भागातील असून त्यापैकी 15 पुरुष अनुक्रमे वय वर्ष, 4, 9, 10, 14, 15, सर्व बालके 18, 18, 20, 20, 22, 25, 27, 30, 34, 45, सर्व प्रौढ आणि 6 स्त्री रुग्ण ज्यांचे वय वर्ष अनुक्रमे 5, 8, 16, बालके 30, 32, 35 प्रौढ असे एकूण दिवसभरात 23 आढळलेले आहेत व या सर्व रुग्णांची सध्या प्रकृती स्थिर आहे.

बुधवार दिनांक 3 जून 2020 रोजी डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 1 व पंजाब भवन कोविड सेंटर येथील 2 रुग्ण असे एकूण तीन रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे.

व तसेच आत्तापर्यंत 175 रुग्णांपैकी 24 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे, 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार आहेत तर 8 रुग्णांनी उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. व उर्वरित 43 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील तीन रुग्णांपैकी दोन स्त्री रुग्ण ज्यांचे वय वर्ष 52 व 65 आणि 1 पुरुष ज्याचे वय वर्ष 38 असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे. तर एक रुग्ण उपचारास्तव मुंबईत संदर्भित करण्यात आलेला आहे

मंगळवार दिनांक 2 जून 2020 रोजी प्रलंबित असलेल्या 267 स्वॉब तपासणी अहवालापैकी 238 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित 19 अहवालांचा रिपोर्ट आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल व बुधवार दिनांक 3 जून 2020 रोजी 111 स्वॉब तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत, त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील असे नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेले आहे.

नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 23 पॉझिटिव रुग्णांची भर.

☑️ दिवसभरात 3 रुग्णांना सुट्टी.

☑️ एकूण रुग्ण संख्या 175 वर.

☑️ आत्तापर्यंत 124 बरे होऊन घरी.

☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.

☑️8 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.

☑️43 रुग्णांवर उपचार सुरू.

☑️एका संदर्भीत रुग्णांवर मुंबई येथे उपचार सुरू

☑️ 2 महिला रुग्ण व एका पुरुष रुग्णांची प्रकृती चिंताजनक.

दरम्यान जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

सदर माहिती ३ जुन सायं ५ वा. प्राप्त नुसार.

Previous articleमालेगांव भागात पावसाला सुरुवात निसर्ग चक्रीवादळाचा सामना करायला प्रशासन सज्ज
Next articleबँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्धतेसाठी सहकार्य करा : – खा. डॉ. भारती पवार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here