Home Breaking News बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्धतेसाठी सहकार्य करा : – खा. डॉ. भारती पवार

बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्धतेसाठी सहकार्य करा : – खा. डॉ. भारती पवार

134
0
  1. *बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्धतेसाठी सहकार्य करा : खा. डॉ. भारती पवार*
    नाशिक (राजेंद्र वाघ प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-
    नासिक जिल्ह्यातील सर्व बॅंकेच्या मुख्य प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली .या बैठकीत शेतकऱ्यांना भेडसावत असणाऱ्या अनेक विषयांवर चर्चा झाली.त्यात प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने कर्ज माफीची घोषणा केली त्यांचे यादीत नाव आहे परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा न झाल्यामुळे त्यांच्या नावे थकीत कर्ज रक्कम दिसत असल्याने त्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. त्याच बरोबर पी.एम. किसान योजनेमध्ये नाव असताना देखील अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नसल्याचे समोर आलेले आहे. ह्या त्रुटी त्वरित दुरुस्त करून त्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर त्या योजनेचे पैसे जमा करावेत, केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड देण्याची सुरवात केली असून त्याची योग्य माहिती शेतकऱ्यांना नसल्याने त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे, फसल बिमा योजना आढावा घेतला असता त्यातही शेतकरी वर्गाला अडचणी येत असल्याचे समजते आहे. त्यासाठीही बँकांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी, बेरोजगार व्यावसायिकांसाठी वरदान ठरलेल्या मुद्रा लोण वाटपाची प्रकिया संथ असून मुद्रा लोण मिळवतांना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. यासाठी बँकांची ह्या मुद्रा लोण संदर्भात काय स्थिती आहे व मुद्रालोण लवकर का वितरित होत नाही याचे स्पष्टीकरण द्यावे, सरकारी बँकेसह खासगी बँकांनाही 3 महिन्यासाठीचे कर्ज हप्ते भरण्यासाठी सूट द्यावी असे आदेश असतांना देखील काही खासगी बँका कर्ज हप्ते भरा असे मेसेज कर्जदारांना पाठवत आहेत. त्यांना स्थगिती देण्यासाठी खासगी बँकांनी आदेश द्यावे.
    पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर बँकेच्या शाखा व ATM ची संख्या कमी असल्याने तिथे नागरिकांना अडचणी येत असून मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे, त्यासाठी उपाययोजना कराव्यात, नांदगावसह आदी भागांत ATM बंद स्वरूपात असून सेवा देखील खंडित होण्याच्या तक्रारी येत आहेत त्यात त्वरित सुधारणा करण्यात यावी. बऱ्याच बँकांमध्ये नागरिकांसह शेतकऱ्यांना बँक खाते उघडण्यासाठी अडचणी येतात त्या का येतात त्याची दखल घ्यावी. अश्या सूचना व प्रश्न खा.डॉ.भारती पवार यांनी आयोजित बैठकीत उपस्थित केले.
    ह्या कोरोना संकटकाळात बँकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना वित्तीय मदत करा. ज्या ज्या ठिकाणावरून शाखा व्यवस्थापक शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देत असतील किंवा अडवणूक करत असतील त्या त्या शाखा व्यवस्थापकाला पुढच्या बैठकीत बोलावून घेऊन त्याचा जाब विचारला जाईल असा सूचक इशाराही खा.डॉ.भारती पवार यांनी बैठकी प्रसंगी दिला. सदर बैठकीस जिल्हाधिकारी सुरज मांढरे, खा.हेमंत गोडसे, महाराष्ट्र बँकेचे अधिकारी तावरे आदी अधिकारी वर्ग उपास्थित होते.
Previous articleनांदेड मध्ये उठले आज “कोरोनाचे वदळ” एकाच दिवसात 23 कोव्हिड रुग्णांची भर, तर त्यात तब्बल 8 बालकांचा समावेश
Next articleमुंबई – वंचित बहुजन आघाडीच्या दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here