• Home
  • मुंबई – वंचित बहुजन आघाडीच्या दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई – वंचित बहुजन आघाडीच्या दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश

*⭕मुंबई – वंचित बहुजन आघाडीच्या दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश.* ⭕
( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕कोरोना आणि निसर्ग चक्रिवादळाच्या स्थितीतही राजकीय पक्षांतर काही थांबत नाहीत. वंचित बहुजन आघाडीच्या दोन माजी आमदारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. माजी आमदार बळीराम शिरस्कर आणि हरीदास भदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी उपस्थित होते.

बळीराम शिरस्कर यांनी वंचितच्या तिकिटावर निवडणूक जिंकत अकोल्यातील बाळापूरमधून आमदारकी मिळवली होती. तर काही महिन्यांपूर्वीच त्यांनी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकला होता. यासह माजी आमदार हरिदास भदे यांनीही काही महिन्यांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. तर आता त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या हाती बांधलं आहे.⭕

 

anews Banner

Leave A Comment