Home अमरावती वकिला विरुद्ध फसवणुकी गुन्हा; बार असोशियनआक्रमक, आयुक्तालयावर धडकले वकील.

वकिला विरुद्ध फसवणुकी गुन्हा; बार असोशियनआक्रमक, आयुक्तालयावर धडकले वकील.

70
0

आशाताई बच्छाव

IMG_20240319_203020.jpg

वकिला विरुद्ध फसवणुकी गुन्हा; बार असोशियनआक्रमक, आयुक्तालयावर धडकले वकील.
———-
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
अमरावती येथे न्यायालयात मृत व्यक्तीच्या नावावर . तोतया उभा करून मासोद येथील जमीन व्याहाराप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात ऑड. वासुसेन देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या विरोधात अमरावती जिल्हा वकील संघ चांगलाच आक्रमक झाला आहे. या विरोधात वकील संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी १८ मार्च रोजी पोलीस आयुक्तालयावर धडक दिली. आयुक्तलयाच्या पायऱ्यावर धरणे दिली. या गुन्ह्यातून ऑड.वासुसेन देशमुख यांचे नाव कमी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी वकील संघाच्या वतीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. निवेदनानुसार, ऑड.वासुसेन देशमुख यांच्याकडे एक पक्षकाराने मोहम्मद इक्बाल भुरेखान यांच्यासोबत झालेल्या व्याहाराची टोकण चिठ्ठी दाखवून आपल्याला या शेताचा व्यावहार करायचा आहे, असे सांगितले. त्यावर ऑड. देशमुख यांनी पक्षकरास जाहीर नोटीस प्रकाशित झाल्यावर त्यांच्याकडे आलेल्या हरकतीवरून मोहम्मद इकबाल भुरेखान हे मयत झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर १५ मार्च रोजी अज्ञात व्यक्तींनी मृतक मोहम्मद इक्बाल भुरेखान यांच्या नावाने खोट्या दस्तऐवजाच्या आधारावर शेतीचे खरेदी सहनिबंधक यांच्याकडे लावली. ही बाब मोहम्मद इकबाल भुरेखान यांचे जावई तऔसइफकआजइ यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी खरेदीचा व्यवहार थांबविला. या प्रकरणात संबंधित आरोपी सोबतच ऑड.वासुसेन देशमुख यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दहा आरोपींना अटक देखील करण्यात आली. तर आंदोलन अधिक आक्रमक पाहता या प्रकरणात वकील संघाचे पदाधिकारी व शेकडो सदस्यांनी पोलीस आयुक्तालय गाठले व पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची भेट घेऊन चर्चा केली. याप्रकरणी ऑड. देशमुख यांची भूमिका फक्त पक्ष करायचे वकील म्हणून जाहीर नोटीस देण्यापर्यंत होती. परंतु पोलिसांनी शहानिशा न करता ऑड. देशमुख यांचे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असा आरोप वकिलांनी निवेदनातून केला आहे. त्यामुळे या गुन्ह्यातून त्यांचे नाव कमी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे निवेदनातून स्पष्ट केले आहे. निवेदन देताना वकील संघाचे अध्यक्ष गिरीश जाखड, सचिव उमेश इंगळे, उपाध्यक्ष नीता टिखिले, सुदर्शन पिंपळगावकर, प्रशांत देशपांडे, चंद्रशेखर डोरले, रसिका उके, पियुष डहाके, पंकज यादगिरी, भूमिका वानखडे, यांच्यासह अनेक वकील उपस्थित होते. व याच प्रकरणात १९ मार्चला वकील संघमार्फत एक दिवसीय लेखणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Previous articleबाभळेश्वर येथे महिला दिन साजरा….
Next articleअमरावती जिल्ह्यातील २५० एसटी बस वरील शासकीय जाहिराती काढल्या, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here