Home Breaking News नांदेडात धडाकेबाज जिल्हाअधिकारी व पोलिस अधिक्षक उतरले स्वतः रस्त्यावर तर संचार बंदिच्या...

नांदेडात धडाकेबाज जिल्हाअधिकारी व पोलिस अधिक्षक उतरले स्वतः रस्त्यावर तर संचार बंदिच्या काळात जिल्ह्यात लाॕकडाऊनची कडक अमलबजावणी – नांदेड,दि १४ ; राजेश एन भांगे

90
0

नांदेडात धडाकेबाज जिल्हाअधिकारी व पोलिस अधिक्षक उतरले स्वतः रस्त्यावर तर संचार बंदिच्या काळात जिल्ह्यात लाॕकडाऊनची कडक अमलबजावणी –
नांदेड,दि १४ ; राजेश एन भांगे

नांदेड जिल्ह्यातील कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्याधिकारी विपीन इटनकर यांनी जिल्ह्यात 12 जुलै 2020 च्या मध्यरात्री पासून ते 20 जुलै 2020 च्या मध्यरात्री पर्यंत पुन्हा कडक लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यामुळे दि 13 जुलै 2020 रोजी सकाळ पासून जिल्ह्यात सर्वत्र शुकशुकाट पहायास मिळाला, आज दिवभरात नियमांचे पालन करत जिल्ह्यातील बाजारपेठा, दुकाने कडकडीत बंद दिसून आली. व शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ठिकाणी पोलिसांचा मोठा फोज फाटा तैनात करण्यात आला होता, आजच्या लॉकडाऊच्या अनुशंगाने जिल्हाधिकारी विपीन इटनकर व जिल्हा पोलीस अधिक्षक विजय कुमार मगर यांनी स्वतः रस्त्यावर उतरून लॉकडाऊन ची कडक अंमलबजावणी करताना दिसून आले, यावेळी त्यांनी जिल्हावासियांना संचार बंदीच्या काळात बाहेर न पडण्याचे आवाहन केले,व प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती ही केली. आज या लॉकडाऊनला नांदेडकरांनी ही चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव, झपाट्याने वाढत असून, जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकड्यात देखील मोठी वाढ होतानाचे चित्र आहे.
आज लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार दि 13 जुलै रोजी जिल्ह्यात दिवसभरात 34 रुग्ण वाढले असून, आज सर्वाधिक 5 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद देखील झाली आहे,
त्यामुळे जिल्ह्यात मृत्यूचा आकडा 35 तर एकूण रुग्ण संख्येचा आकडा 650 वर पोहोचला आहे, व सध्यास्थितीत जिल्ह्यात आणखी 27 व्यक्तींची प्रकृती गंभीर स्वरूपाची असल्याचं नांदेड आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आला आहे.
त्यामुळे कोरोना या महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी, नांदेडकरांनी लॉकडॉऊन नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व मानवी साखळी तोडून, कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटकर यांनी जिल्हावासीयांना केले आहे.

Previous articleमहाबीजसह सोयाबीन कंपन्यावर ४६ फौजदारी गुन्हे दाखल ; कृषी विभागाची न्यायालयात माहिती – विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे
Next articleनांदेड” कोरोनातून ५ रूग्ण बरे तर जिल्ह्यात ४० व्यक्ती बाधित व हिंगोली येथील एकाचा मृत्यू , एकूण मृत्यू ३६ – नांदेड,दि. १४ ; राजेश एन भांगे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here