Home जालना जालना बसस्थानक परिसरात महिला आणि मुलींसाठी शौचालय

जालना बसस्थानक परिसरात महिला आणि मुलींसाठी शौचालय

147

आशाताई बच्छाव

IMG_20231107_054955.jpg

जालना बसस्थानक परिसरात महिला आणि मुलींसाठी शौचालय
तयार उभारावे ः शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सौ. मंगल मेटकर
जालना (दिलीप बोंडे)ः जालना शहरातील बसस्थानक परिसरात महिला आणि मुलींसाठी शौचालय उभारण्यात यावे अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख महिला आघाडीच्या सौ. मंगल मेटकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना शहरामध्ये एकच बस स्थानक असून या ठिकाणाहून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवासी बसने प्रवास करत आहे. तसेच महिला आणि मुली देखील या बसने मोठया प्रमाणात प्रवास करतात. परंतु जाला शहरातील या बसस्थानकामध्ये महिला व मुलींसाठी साध्या शौचालयाची व्यवस्था देखील नाही. बसची वाट पाहात थांबलेल्या महिला, मुलींना लघुशंकेसाठी, शौचालयासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. यामुळे महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बस स्थानक परिसरात महिला, मुलींसाठी सुलभ शौचालय तयार करण्यात यावे. अशी मागणी देखील या निवेदनात मंगल मेटकर यांनी केली आहे.

Previous articleसावली तालुका भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती आघाडी अध्यक्षपदी लोकनाथ रायपुरे यांची नियुक्ती
Next articleदेवाच्या नामाने व संताच्या अमृत वचनामुळे जीवन सफल होते- ह.भ.प. योगीराज महाराज लोखंडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.