Home विदर्भ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या दावेदारी मध्ये भाजपाच्या चारही महीला नगरसेविका शर्यतीत।

नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या दावेदारी मध्ये भाजपाच्या चारही महीला नगरसेविका शर्यतीत।

130
0

राजेंद्र पाटील राऊत

नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या दावेदारी मध्ये भाजपाच्या चारही महीला नगरसेविका शर्यतीत।
गडचिरोली(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठ न्युज नेटवर्क(: गडचिरोली जिल्हातील 09 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली असुन कुरखेडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी महीला जनरल ची जागा निघाल्याने अनेक पुरुष नगरसेवक हिरमुसल्या गेले आहेत.त्यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले तर महिला नगरसेविका मध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झाले आहे.माञ भाजपाच्या चारही महीला नगरसेविका नगराध्यक्ष पदाच्या दावेदार असल्याने पक्षनेत्रूत्व नगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.कुरखेडा नगरपंचायतीवर भाजपाचे सतरा पैकी नव उमेदवार निवडुण आले.त्यामध्ये चार महीला व तीन पुरुष नगरसेवकांचा समावेश आहे.
नगरपंचायतीवर भाजपाने एकहाती सत्ता काबीज केली आहे.परन्तु आता नगराध्यक्षपदासाठी चारही महीला नगरसेवकांनी आपण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असुन पक्ष आमचा विचार करेल असा आशावाद वेक्त केला आहे.भाजपाच्या नवयुक्त महिला नगर सेविकामध्ये दुर्गा गोटेफोडे,चरण रविंद्र जयश्री रासेकर, गौरीताई ऊईके,अलका गीरडकर यांचा समावेश आहे.होणार्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे वरिष्ट नेते मंडळी कुणाच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ घालतात हे येणार्या सात आठ दिवसांमध्ये कळणार आहे.आतापासुनच नगराध्यक्षपदाच्या दावेदारीसाठी मोचेबांधणी सुरु झाली आहे हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here