राजेंद्र पाटील राऊत
बुलडाण्यात देशी-विदेशी दारूचा साठा जप्त; LCB ची
बुलडाणा (ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा ) बुलडाणा शहरातील भीमनगरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) छापा मारून देशी- विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला. दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबीचे पथक पेट्रोलिंग करत असताना जयस्तंभ चौकात त्यांना गोपनीय माहिती मिळाली, की भीमनगर येथील रहिवासी विजय हरी जाधव व आकाश लक्ष्मण जाधव हे दोघे अवैधरित्या घरात देशी-विदेशी दारूचा साठा बाळगून आहेत. पोलिसांनी तातडीने दोघांच्या घरी छापा मारला. त्यांच्या घरात देशी-विदेशी दारूचा ४२ हजार ४२० रुपयांचा साठा मिळून आला. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरिक्षक मनिष गावंडे, सहायक पोलीस निरिक्षक विलासकुमार सानप, पोहेकाँ दीपक लेकुरवाळे, पोहेकाँ रामविजय राजपूत, पो.ना. राहुल बटुकर, दिनेश बकाले, गणेश पाटील, मनोज खरडे, सतीश जाधव, मपोकाँ सरिता वाकाेडे यांनी पार पाडली.




