राजेंद्र पाटील राऊत
2 लाख 30 हजारांचा मोहसडवा व दारु नष्ट।
गडचिरोली(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): तालुक्यातील चांदाळा,रानभुमी व रानमुल जंगल परिसरातील विविध ठिकाणी मिळुन आलेल्या 2 लाख 30 हजार रुपये किमंतीचा 40 ड्रम मोहफुलाचा सडवा व दारु नष्ट केल्याची कार्यवाही गडचिरोली पोलीस व मुक्तीपथ तालुका चमुने संयुक्तरित्या शनिवार 29 जानेवारी रोजी केली.याप्रकरणी चांदाळा व राणभुमी येथील चार दारु विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महागू रामजी तुमरेटी,मणीराम महागू तुमरेटी दोन्ही रा.चांदाळा व रानमुल येथील विनोद कवडु गेडाम,कवडु तुळशीराम गेडाम,असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दारु विक्रेत्यांचे नावे आहेत.
चांदाळा,रानभुमी व रानमुल या गावात मोठ्या प्रमाणात दारु विक्री केली जाते.या गावाच्या मध्यभागातुन तालुक्यातील बोदली,जेप्रा,जेप्रा चक ,राजगाटा माल,,राजगाटा चक, उसेगाव व जिल्हाचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहरासह इतर गावात सुध्दा दारु पुरविली जाते.सोबतच गावात मध्धपींची लाइन लागलेली असते.यामुळे परिसरातील अनेक गावे ञस्त झाले आहेत.याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात वांरवार तक्रारी प्राप्त होत होत्या.
गुप्त माहीतीच्या आधारे गडचिरोली पोलीस व मुक्तीपथ तालुका चमुने सयुक्तरित्या चांदाळा जंगल परिसरात शोधमोहीम राबवत दारु अड्डे उध्वस्त केले.तसेच पाच ते सहा ठिकाणी टाकलेला 2 लाख रुपये किंमतीचा 40 ड्राम मोहसळवा व 30 हजार रुपये किमंतीची 100 लिटर हातभट्टी दारु नष्ट करण्यात आली.याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कार्यवाही गडचिरोली चे ठाणेदार अंरविदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली नापोशी स्वप्निल कुडावले,धंनजय चौधरी,पोशि परशुराम हलामी,सुजाता ठोंबरे,मुक्तीपथ तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केली,यावेळी रानभुमी येथील पोलीस पाटिल विजय कुंमरे,किसन उसेन्डी उपस्थित होते.