Home कोल्हापूर वडगांवात ठेकेदाराने केले रात्रीचे डांबरीकरन , युवकांनी घेतली स्टँम्मवर लेखी हमी

वडगांवात ठेकेदाराने केले रात्रीचे डांबरीकरन , युवकांनी घेतली स्टँम्मवर लेखी हमी

137
0

राजेंद्र पाटील राऊत

वडगांवात ठेकेदाराने केले रात्रीचे डांबरीकरन ,
युवकांनी घेतली स्टँम्मवर लेखी हमी

पेठ वडगांव : शहरातील आझाद चौक ते बागवान गल्लीपर्यंत रात्रीचे सुमारे नऊ वाजता डांबरीकरन रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे युवकांनी रात्रीच्या रस्त्यास विरोध केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला .
युवकांनी ऊत्कृष्ठ दर्जाचा रस्ता करण्याबाबत स्टँम्प पेपरवर ठेकेदार तात्यासाहेब मगदुम यांच्याकडून लेखी हमी घेतल्यानंतर कामास सुरवात केली.
सद्या शहरात बऱ्याच ठिकाणी डांबरीकरन रस्त्याचे काम सुरू आहे पालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ठेकेदार मनमानी कारभार करत असल्याचे दिसुन येत आहे.
लाटवडे रोड परिसरात भर पावसातच डांबरीकरन केल्याने शहरात सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
तसेच शहरातील पन्हाळकर वसाहत ते अपराध काँलणीत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पिसे यांनी कडाडून विरोध केला मुरमी करणावर पाणि कमी , रोलींग कमी झाल्याचे ठेकेदारास दाखवून दिले.
ठेकेदारीची चूक लक्षात येताच रस्त्याचे काम दर्जेदार करण्याचे आश्वासन दिल्यामुळे रस्त्याचे काम पुर्वरत सुरू केले.
सदर रस्त्यावर ठेकेदारांने परत मुरूम टाकून पाणी मारून रोलींग केले.
शहरातील कोणत्याही रस्त्यास आमचा विरोध नाही पण आमच्या शहरातील रस्ते मात्र चांगले व उत्कृष्ट दर्जाचे झाले पाहिजेत असे मत सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पिसे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here