Home पश्चिम महाराष्ट्र टेंभुर्णी पोलिस ठाण्यातील अमानवी कृत्याबाबत पोलिस निरीक्षक केंद्रे व इतर अधिकारी यांना...

टेंभुर्णी पोलिस ठाण्यातील अमानवी कृत्याबाबत पोलिस निरीक्षक केंद्रे व इतर अधिकारी यांना निलंबित करून ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कडक शासन झालेच पाहिजे या मागणीचे निवेदन क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सोलापुर पोलिस अधिक्षका तेजस्विनी सातपुते यांना देण्यात आले.

125
0

राजेंद्र पाटील राऊत

टेंभुर्णी पोलिस ठाण्यातील अमानवी कृत्याबाबत पोलिस निरीक्षक केंद्रे व इतर अधिकारी यांना निलंबित करून ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कडक शासन झालेच पाहिजे या मागणीचे निवेदन क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सोलापुर पोलिस अधिक्षका तेजस्विनी सातपुते यांना देण्यात आले.
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

सोलापूर
महाराष्ट्रात कोरोना माहामारीने थैमान घातले आहे असे असतानाही बेकायदेशीर रित्या वर्दीचा धाक दाखवून टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी मातंग समाजातील 50 ते 60 महिलांना व लहान मुलांना आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांच्या मर्जीविरुद्ध, विना मास्क, विना मोबदला पोलीस ठाण्याच्या परिसरातील कचरा, घाण, गटारी, संडास साफ करायला लावून मानवी व जनावरांची विष्ठा जबरदस्तीने उचलायला लावल्या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांच्यावर ऑट्रासिटी अंर्तगत गुन्हे दाखल करून तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सोलापूर ग्रामीण पोलिस अधिक्षका तेजस्वी सातपुते यांच्याकडे क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली.
” दलितांनीच साफसफाई केली पाहिजे ” ही मनुवादी वृत्ती बाळगून रक्षकच भक्षक झाल्याची घटना टेंभुर्णी येथे दिनांक २९ मे रोजी घडली आहे. टेंभुर्णी ता.माढा येथील अण्णा भाऊ साठे नगर मधील रहिवासी असलेल्या मागासवर्गीय मांग जातीतील 50 ते 60 महिलांना व मुलांना दिनांक-२९ मे रोजी दुपारी १२.०० च्या सुमारास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजकुमार केंद्रे यांच्या समक्ष व आदेशानुसार त्यांच्या राहत्या घरी जाऊन धक्का बुक्की करत घरातून ओढत आणुन पोलीस स्टेशनच्या संरक्षक भिंती लगतची माणसांची व जनावरांची विष्ठा उचलायला लावली व पोलिस ठाण्याच्या कंपाऊंड लगतचा परिसर त्यांच्या मर्जीविरुद्ध स्वच्छ करून घेतला . विना मास्क, सोशल डिस्टन्स न पाळता, शिवीगाळ करत, मारहाण करण्याची धमकी देऊन सदर महिलांकडून व लहान मुलांकडून साफसफाई करून घेतली गेली. या महिलांनी तसे न करण्याविषयी बोलले असता पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी व त्यांच्या समवेत पी. एस.आय. काशिद,पो.कॉ. ठोंबरे,पो.कॉ. ननवरे, पो.का.गुठाळ, इतर पोलीस कॉन्स्टेबल व होमगार्ड यांनी सदरील महिलांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करून काठीने व पट्टयाने मारहाण करण्याचा धाक दाखवून सक्तीने साफसफाई करण्यास सांगितले . ५०ते ६० महिलांना व मुलांना दर तीन दिवसाला तुम्ही असेच पोलीस स्टेशनच्या आवारात येवून विना मोबदला घाण साफ करायची;अन्यथा तुमच्यावर व तुमच्या कुटुंबातील व्यक्तीवर खोटया केसेस दाखल करून तुम्हाला डांबून मारहाण करण्यात येईल अशी धमकी वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली.
कोरोना महामारी च्या संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकार व मा. जिल्हाधिकारी साहेब,सोलापूर यांचा आदेश पायदळी तुडवत टेभुर्णी पोलीस ठाण्याच्या या सर्व कर्मचाऱ्यांनीआपली एकाधिकार शाही दाखवली आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे नगर टेंभुर्णी येथील मातंग समाजातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वर्दीचा बेकायदेशीर वापर करणाऱ्या मा. केंद्र साहेब व पी एस आय. काशिद, पो.कॉ.ठोंबरे, पो.कॉ. ननवरे, पो.कॉ. गुठाळ, इतर पोलीस कॉन्स्टेबल व होमगार्ड यांच्यावर जातीय वाचक शिवीघाळ करणे, घरातुन जबदस्तीने ओडून आणणे, बेकायदेशीर रित्या टेंभुर्णी पोलीस स्टेशन मधील कचरा,घाण, गटारी व संडास, विष्टा त्यांच्या मर्जीविरुद्ध साफ करून घेणे, या सर्व अमानवीय कृत्यास शासन म्हणून सर्वांची उच्च स्तरीय चौकशी करून संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अँट्रासिटी कायद्यांर्तगत कायदेशीर कार्यवाही करावी. त्यांची तात्काळ बडतर्फी करावी,अथवा निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल अशी इशारे वजा मागणी लेखी निवेदनाद्वारे क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना समक्ष भेटून करण्यात आली. सदर आशयाचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांना ई-मेल द्वारे पाठवण्यात आले आहेत .
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे,भारतीय दलित महासंघ जिल्हाध्यक्ष विकास कसबे,शहराध्यक्ष विजय आडसूळे,जिल्हा उपाध्यक्ष संजय साठे तसेच मातंग समाज अन्याय निवारण समिती महाराष्ट्र राज्य सचिव टी. एस. क्षीरसागर आदी उपस्थित होते.

Previous articleसोलापूर जिल्ह्यातील या दोन युवा सरपंचांची मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
Next articleवडगांवात ठेकेदाराने केले रात्रीचे डांबरीकरन , युवकांनी घेतली स्टँम्मवर लेखी हमी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here