Home पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रीय वारकरी परीषद आणि हरिप्रसाद यात्रा ग्रुप यांच्या वतीने श्रीगोंदा येथील सामाजिक...

राष्ट्रीय वारकरी परीषद आणि हरिप्रसाद यात्रा ग्रुप यांच्या वतीने श्रीगोंदा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री सुभाष ढवळे यांना सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर.

178
0

राजेंद्र पाटील राऊत

राष्ट्रीय वारकरी परीषद आणि हरिप्रसाद यात्रा ग्रुप यांच्या वतीने श्रीगोंदा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री सुभाष ढवळे यांना सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर.
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.आळंदी
गेली पाच वर्षांपासून ते आजपर्यत संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियाच्या माध्यमातून व स्वतःच्याच हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून व स्वतः मुला मुलींच्या गावी जाऊन मध्यस्थी करून आजपर्यत सर्वधर्मीय मुलामुलींचे दोनशे पेक्षा अधिक विवाह जमवुन दिले आहेत या सर्वाचा संसार व्यवस्थित गुण्यागोविंदाने चालला आहे अल्पवधीतच श्री सुभाष ढवळे यांचे हे कार्य महाराष्ट्र.गुजरात.मध्यप्रदेश.कर्नाटक या राज्यातील जनतेला हॉटस ग्रुपच्या माध्यमातून माहीत झाले या चार राज्यातील जनतेने श्री सुभाष ढवळे यांचे कार्य सातत्याने जवळून पाहत आहे गेल्या पाच वर्षात श्री सुभाष ढवळे यांचा महाराष्ट्रात विविध ठिकाणी राजकीय.सामाजिक आणि इतरही संस्था आणि मित्रमंडळ यांनी सुद्धा मान.सन्मान केलेले आहेत या कार्याची दखल घेत राष्ट्रीय वारकरी परीषद व हरिप्रसाद यात्रा ग्रुप यांच्या वतीने श्री क्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी शतकोत्तर रौप्य महोस्तवी वर्ष ७२५ सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह दि २८.११.२०२१ ते २.१२.२०२१ रोजी सांगता आहे या कार्यक्रमात दि.२८.११.२०२१ वार रविवार रोजी दुपारी १.०० वा. ढवळे वधु वर सुचक श्रीगोंदा येथील अध्यक्ष श्री सुभाष ढवळे यांना महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार आणि विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे आयोजक हरिप्रसाद यात्रा ग्रुप चे अध्यक्ष ह.भ. प श्री कृपेन महाराज गुरव आणि ह.भ. प .श्री जालिंदर महाराज मोरेआळंदी यांनी सांगितले आहे श्री क्षेत्र आळंदी येथे समाधी सोहळा आणि हरिनाम सप्ताह याचा महाराष्ट्रातील जनतेने व आपणही अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पुरस्कार प्राप्त श्री सुभाष ढवळे श्रीगोंदा यांनी केले आहे

Previous articleनायगाव सिटी दातांच्या दवाखान्या तर्फे तीन दिवसीय मोफत दंत तपासणी शिबिर.
Next articleगुलबर्गा जिल्ह्यात बनवेश्वर खानावळीत अर्धा किलो गांजा जप्त दारुबंदी विभागाची धाडसी कारवाई
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here