Home गुन्हेगारी गुलबर्गा जिल्ह्यात बनवेश्वर खानावळीत अर्धा किलो गांजा जप्त दारुबंदी विभागाची धाडसी कारवाई

गुलबर्गा जिल्ह्यात बनवेश्वर खानावळीत अर्धा किलो गांजा जप्त दारुबंदी विभागाची धाडसी कारवाई

267
0

राजेंद्र पाटील राऊत

गुलबर्गा जिल्ह्यात बनवेश्वर खानावळीत
अर्धा किलो गांजा जप्त दारुबंदी विभागाची धाडसी कारवाई
गुलबर्गा,(यशवंतराव सुर्यवंशी ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-काल रविवार दिनांक २१ रोजी गुलबर्गा जिल्ह्यातील चितापूर तालुक्यात असलेल्या ठेंगळी क्राँसमधील बनवेश्वर खानावळीत (हाँटेल) मध्ये अवैधरित्या गांजा असल्याची माहिती मिळताच दारुबंदी विभागाने छापा मारुन धाडसी कारवाई करीत या हाँटेलातून आरोपी विरय्या शिवकांतय्या स्वामी यांचेकडून अर्धा किलो गांजा जप्त करुन त्यास अटक केली.त्याच्याविरुध्द दारुबंदी डि.सी.आय.आय.बी.दारुबंदी निरीक्षक श्री.गोपाळे पंडीत यांनी हे प्रकरण दाखल केलेले आहे.गुलबर्गा जिल्हा दारुबंदी आयुक्त आणि गुलबर्गा दारुबंदी विभाग यांच्या आदेशानुसार हि कारवाई करण्यात आलेली आहे.डि.सी.पी.दारुबंदी विभाग यांच्या नेतृत्वाखाली पक्की खबर मिळताच सदर हाँटेलवर छापा टाकण्यात येऊन अर्धा किलो गांजासह आरोपीस अटक करण्यात आले.या कारवाईत चितापूर विभागाचे डि.एस.पी.श्री.विजयकुमार रामपूरे,सब इन्स्पेक्टर श्री.नरेंद्र,हेड काँन्सटेबल अण्णाप्पा नवले,श्री.शिवप्पा गौडा,आणि वाहनचालक श्री.आनंद यांच्या उपस्थितीत हि मोलाची कामगिरी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here