Home पश्चिम महाराष्ट्र अखेर चौपदरी नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची ई निविदा निघाली 

अखेर चौपदरी नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची ई निविदा निघाली 

79
0

राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक

अखेर चौपदरी नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची ई निविदा निघाली  युवा मराठा प्रतिनिधी महादेव घोलप
कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या व अनेक जिल्याना जोडणाऱ्या नगर सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र.516 अ.या चौपदरी महामार्गाच्या कामाची ई निविदा नुकतीच जाहीर झाल्याने राष्ट्रवादीचे युवा नेते आ. रोहित पवार यांनी केबिनेट मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष आभार मानले.नगर ते टेंभुर्णी या महामार्गाच्या कामासाठी 614.45 कोटी एवढा निधी दोन पॅकेज मध्ये देण्यात येणार आहे.अनेक अडचणींमुळे गेली 3-4 वर्षांपासून या रस्त्याच्या कामाची कार्यवाही थांबली होती. महामार्गाच्या जागेसाठी भूसंपादन,
काही गावांच्या पाणीपुरवठा नलिका व इतर अनेक अडचणींमुळे या कामास अड थळा निर्माण झाला होता. व आता सर्व अडथळे दूर करून महामार्गाच्या कामास सुरुवात करून ई निविदा का ढण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here