• Home
  • राजकीय आमदार शिंदे यांनी केलेल्या नियोजन व पाठपुराव्यामुळेच बिबट्याला ठार मारण्यात यश – या घटनेचे राजकीय भांडवल करू नये : राजेंद्र बारकुंड

राजकीय आमदार शिंदे यांनी केलेल्या नियोजन व पाठपुराव्यामुळेच बिबट्याला ठार मारण्यात यश – या घटनेचे राजकीय भांडवल करू नये : राजेंद्र बारकुंड

राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक

IMG-20201222-WA0063.jpg

राजकीय आमदार शिंदे यांनी केलेल्या नियोजन व पाठपुराव्यामुळेच बिबट्याला ठार मारण्यात यश – या घटनेचे राजकीय भांडवल करू नये : राजेंद्र बारकुंड  युवा मराठा प्रतिनिधी, महादेव घोलप
करमाळा : नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठी आ.संजयमामा शिंदे यांचे योग्य नियोजन व पाठपुरावा तसेच त्याला ठार मारण्यासाठी काढलेली परवानगी यासाठी केलेले प्रयत्न यामुळे सर्वकाही शक्य झाले आहे . याचे श्रेय कोणीही न घेता त्याचे राजकीय भांडवल करू नये ; असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी केले आहे .याबाबत बोलताना ते म्हणाले , की कुंदेवाडी येथे नरभक्षक बिबट्याने हल्ला केल्यानंतर आ.शिंदे यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तात्काळ यंत्रणा कामाला लावली . त्यानंतरही बिबट्याने अंजनडोह येथे एका महिलेवर हल्ला करून ठार केले . त्यावेळी आ.शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनमंत्री तसेच वन अधिकारी यांचेकडे बिबट्याला ठार मारण्याची परवानगी तात्काळ मागितली . एवढेच नाहीतर तसा आदेशही तात्काळ मिळविला . त्यानंतर त्याला मारण्याची यंत्रणा वेगाने चालू झाली . तसेच पंचायत समिती कार्यालयात तालुक्याचे सर्व अधिकारी , कर्मचारी व पदाधिकारी यांची बैठक घेऊन सर्वांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या होत्या.

anews Banner

Leave A Comment