Home विदर्भ अकोला,बुलढाणा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांना घाबरण्याची गरज नाही – शेगाव तहसीलदार...

अकोला,बुलढाणा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांना घाबरण्याची गरज नाही – शेगाव तहसीलदार बाजड

119
0

आशाताई बच्छाव

IMG_20240326_231310.jpg

अकोला,बुलढाणा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांना घाबरण्याची गरज नाही – शेगाव तहसीलदार बाजड

ब्युरो चीफ बुलढाणा (ज्ञानेश्वर पाटील दांदळे) – बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव व नजीकच असलेल्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का आज (दि.२६) सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास जाणवला. या घटनेने परिसरात एकच घबराट पसरली होती. रिश्टर स्केलवर या धक्क्याची २.९ इतक्या तीव्रतेची नोंद झाली आहे. काही दिवसांपूर्वीच नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता शेजारील जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे.
संत नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेगाव शहरातील अनेक भागात २६ मार्च रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजेदरम्यान भूकंपाचा अतिशय सौम्य असा धक्का नागरिकांना जाणवला. यामुळे काही वेळ अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण ही निर्माण झाले होते. या धक्क्याची शेगावात २.९ रिश्टर स्केलवर झाली नोंद झाली असून, यास तहसीलदार डी. आर. बाजड यांनीही दुजोरा दिला आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे आवाहन तहसीलदार यांनी लगेच सोशल मीडियाच्या माध्यमातून केले. शेगावनजीक असलेल्या बाळापूरमध्येही सौम्य धक्का जाणवल्याची माहिती हाती आली आहे. हे धक्के गांभीर्याने घेण्याची बाब नसली तरी, मागील आठवड्यात नांदेड शहर आणि अर्धापूर, मुदखेड, नायगाव, देगलूर, बिलोली या तालुक्यातून तीन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे ४.५, ३.६ आणि १.८ अशी तीव्रता नोंदवण्यात आलेली आहे. त्यामुळे नांदेड जिल्हा परिसरात असलेल्या या भागातही भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने काळजी व्यक्त केली जात आहे.

Previous articleमोहफुल वेचण्याकरता गेलेल्या महिला वाघाच्या हल्ल्यात ठार
Next articleश्री बाकलीवाल विद्यालयाचा माजी विद्यार्थी झाला उपशिक्षणाधिकारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here