Home विदर्भ हिंगोली येथे भा.ज.पा.समर्थ मंचचि विभागीय बैठक संपन्न.

हिंगोली येथे भा.ज.पा.समर्थ मंचचि विभागीय बैठक संपन्न.

45
0

आशाताई बच्छाव

IMG_20240320_125139.jpg

हिंगोली येथे भा.ज.पा.समर्थ मंचचि विभागीय बैठक संपन्न.
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख

याविषयी सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय भाजपा समर्थक मंचच्या मराठवाडा विभागीय कार्यकर्त्यांची बैठक मा.पुरुषोत्तमजी श्रीवास्तव यांच्या आदेशानुसार,महाराष्ट्र प्रदेश कार्यवाह प्रदेश अध्यक्ष पंडितराव तिडके यांच्या अध्यक्षतेखाली तसेच श्री वसंतरावजी देशमुख विभागीय अध्यक्ष राष्ट्रीय भाजपा समर्थक मंच यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 20/02/2024रोजी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती.
नांदेड, हिंगोली,परभणी जालना,जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी महिला पुरुष जिल्हा व तालुका अध्यक्ष अध्यक्षा पदाधिकारी शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे दिनांक १८/०२/२०२४ रोजी रविवारी उपस्थित होते. ,या बैठकीस पंडितराव तिडके महाराष्ट्र प्रदेश कार्यवाह प्रदेश अध्यक्ष, श्री वसंतराव देशमुख विभागीय अध्यक्ष तथा दैनिक एकनिष्ठा कार्यकारी संपादक, तथा भाजपा समर्थक मंचचे हिंगोली जिल्हाध्यक्ष श्री बालाजी वानखेडे यांच्यासह मराठवाडा विभागीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना मा.पंडितराव तिडके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भाजपा समर्थक मंचच्या माध्यमातून पक्षाचे काम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत कार्यकर्त्यांना पक्षाचे काम करत असताना कोणत्याही अडचणी आल्या तरी पक्ष आपल्याला मदत करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.यानंतर राष्ट्रीय भाजपा समर्थक मंचचे विभागीय अध्यक्ष मा.श्री वसंतराव देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यांनी राष्ट्रीय भाजपा समर्थक मंचच्या सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपा समर्थक मंचच्या कार्याविषयी पदाधिकाऱ्यांना अवगत केले.समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचुन पक्षाचा प्रचार आणि प्रसार कसा होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.यावेळी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम विभागीय अध्यक्ष श्री वसंतराव देशमुख यांनी केले असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत असल्याचे दिसून आले. सर्वच पदाधिकाऱ्यांनी पक्षवाढीसाठीच कामं करण्याचं आवाहन श्री वसंतराव देशमुख यांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना केले आहे.यावेळी अनेक विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले यासोबतच लवकरच आपण संपुर्ण महाराष्ट्र राज्याचा दौरा करणार व सर्व जिल्ह्यातील भाजपा समर्थक मंचच्या पदाधिकारी यांना मार्गदर्शन करुन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करणार असल्याचा निर्धार विभागीय अध्यक्ष श्री वसंतराव यांनी व्यक्त केला आहे.या बैठकीला जालना जिल्हाध्यक्ष श्री कृष्णा लहाने, हिंगोली जिल्हाध्यक्ष श्री बालाजी वानखेडे, जालना जिल्हा उपाध्यक्ष मुरलीधर डहाके, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष श्री संदीप शिंदे रमेश कुटे , वंदना थिटे, सुवर्णाताई अकमार, सचिन दराडे, अनिल लोंढे तसेच हिंगोली, जालना,परभणी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीस जिल्हा तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleछत्रपती संभाजीनगर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची बैठक संपन्न.
Next articleजिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here