Home जालना जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

72
0

आशाताई बच्छाव

IMG_20240320_125442.jpg

जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख

याविषयी सविस्तर वृत्त असे की,
शेळगाव आटोळ ता.चिखली जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांच्या कलागुणाला वाव देणारा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम शाळेमध्ये मुख्याध्यापक श्री एम. बी. सुरडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. याप्रसंगी अंढेरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री विकास पाटील साहेब उद्घाटक म्हणून लाभले. प्रमुख उपस्थितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गजानन भाऊ गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य गण शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सदस्य गण ..त्याचप्रमाणे राजकीय सामाजिक सहकार क्षेत्रातील आजी-माजी गणमान्य व्यक्तींची उपस्थिती होती.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी …जवळपास 79 कलाकृती सादर केल्या. ज्यामध्ये व्यसनमुक्ती,देशभक्ती,राष्ट्रीय एकात्मता,सर्वधर्मसमभाव, शेतकरी आत्महत्या,जय जवान जय किसान,स्त्री पुरुष समानता, बेटी बचाव बेटी पढाव,मनोरंजनात्मक तथा प्रबोधन पर अशा अनेक मुद्द्यांवर हृदयस्पर्शी कलाकृती सादर करण्यात आल्या
*वरील सर्व कलागुणांना वाव मिळावा म्हणून गावातील समस्त पालकांनी 42710 /..(बेचाळीस हजार सातशे दहा) रुपयांच्या बक्षिसांची लयलूट करून मुख्याध्यापक सर्व शिक्षक विद्यार्थी यांचा यथोचित गुणगौरव केला.
सदर बक्षीस रकमेचा विनियोग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात आला ज्यामध्ये विद्यार्थ्यांना पेपरपॅड ,कंपास पेटी, स्केल ,नोटबुक असे विविध शालेय उपयोगी साहित्य देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यात आला. बक्षीस वितरण प्रसंगी शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री एम. बी. सुरडकर सर तसेच सर्व शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गजानन भाऊ गावडे उपाध्यक्ष तथा समिती त्याचप्रमाणे गावातील गणमान्य व्यक्ती यांची उपस्थिती होती.

Previous articleहिंगोली येथे भा.ज.पा.समर्थ मंचचि विभागीय बैठक संपन्न.
Next articleॲड विनया नागरे (बन्सोड) यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here