Home नाशिक घोरवड येथील श्री राम मंदिरात भरला बालगोपाळांचा मेळा

घोरवड येथील श्री राम मंदिरात भरला बालगोपाळांचा मेळा

296

आशाताई बच्छाव

IMG_20231224_061601.jpg

सुदर्शन बर्वे (भगूर प्रतिनिधी)
घोरवड येथील श्री राम मंदिरात भरला बालगोपाळांचा मेळा

भगुर येथिल नुतन प्राथमिक विद्या मंदिर,( धृव बालक विद्या मंदिर) मधील लहान मुलांची सहल आयोजित करण्यात आली होती या निमित्ताने प्रभु श्री राम यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या नाशिक जवळील घोरवड येथील प्रयागतीर्थ येथे नेण्यात आले. तेथील माहिती अशी की श्री जटाऊ व रावण यांच्यात युद्ध झाल्याने रावणाने त्यांचे पंख छाटले व जटायू या ठिकाणी पडले नंतर जटायू सरपटत श्री क्षेत्र टाकेद पर्यंत गेले. श्री प्रभु राम या ठिकाणी आल्यावर यांना जटायू चे पंख मिळाले, पुढे श्री राम टाकेद येथे आले व नंतर श्री प्रभु राम आणि जटायु यांची भेट झाली व श्री राम यांचे दर्शन घेऊन जटायु यांनी प्राणत्याग केला. यांना मोक्ष मिळावा म्हणून श्री राम प्रभु यांनी सर्व तीर्थ यांना बोलावले व ते सर्व आले पण तिर्थराज प्रयागराज गर्व व अहंकार झाला मी गेलो नाही तर माझ्या साठी प्रभु श्री राम थांबून राहतील.पण श्री लक्ष्मण प्रभु यांनी बाण मारुन लगेचच जमीनीतुन प्रयागतीर्थ काढले मग श्री राम प्रभु यांनी सर्व तीर्थाचे जल घेऊन मोक्षविधी पुर्ण केला असे सांगितले जाते अशा या पावन ठिकाण सहल आयोजित करण्यात आली असून या प्रसंगी धृव बालक विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ देशमुख मॅडम, तसेच शिक्षिका सोनवणे मॅडम, पंढोरे मॅडम, गाढवे मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते

Previous articleभगुर येथील मांगिर बाबा चौकला अतिक्रमणाचा विळखा
Next article२० हजार रुपये बोनस देण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा-खा.नेते_
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.