Home नाशिक भगुर येथील मांगिर बाबा चौकला अतिक्रमणाचा विळखा

भगुर येथील मांगिर बाबा चौकला अतिक्रमणाचा विळखा

164
0

आशाताई बच्छाव

IMG_20231224_061235.jpg

(भगूर प्रतिनिधी-)
भगुर येथील मांगिर बाबा चौकला अतिक्रमणाचा विळखा

भगुर नगर पालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मांगिर बाबा चौक येथे मोठ्या प्रमाणावर हातगाडी व्यवसाईकांनी रहदारिच्या रस्त्यावर आपले व्यवसाय थाटले. या मुळे स्थानिक नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या हातगाडी व्यवसायावर तळत असलेल्या पदार्थांमुळे सर्वत्र तेलकट वास पसरतो, बाजूलाच रहिवासी इमारत असल्याकारणाने येथिल नागरिकांची आरोग्य हि धोक्यात असल्याने भगुर नगर पालिका प्रशासन हे डोळेझाक करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. कारण हे व्यवसाईक घरगुती वापराचे गॅस सिलिंडर वापरून बनवलेले पदार्थ तयार करत असतात या मुळे जर गॅस सिलिंडरची दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांना पडला असून भनपा प्रशासन मात्र या कडे सपशेल दुर्लक्ष करत आहे वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन ही कार्यवाही केली जात नाही हि बाब म्हणजे एक नवलच आहे असे म्हणावे लागेल येथिल काही रहिवासी नागरिक हे त्यांच्या स्वमालकीच्या दुकानात आपला व्यवसाय करतात आणि यांच्या दुकानात समोर अतिक्रमणे होत असून अनेक वेळा वादविवाद होतात, कधी कधी रस्त्यावर तेल ही पडते या मुळे छोटे मोठे अपघात ही होतात तरिहि नगरपालिका कार्यवाही करत नाही, तरि सदर व्यवसाकांना दुसरी कडे जागा उपलब्ध करून देऊन व्यवसाय चालू करावा अशी मागणी केली जात असून या प्रसंगी भनपा प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करणे आवश्यक आहे. तरी सदर प्रसंगी भगुर नगर पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून या साठी श्याम देशमुख,हरीश देशमुख अशोक लोया, बाळासाहेब लाहोटी, हर्षल देशमुख, यश देशमुख, प्रकाश सुराणा, गणेश निसाळ, प्रशांत लोया, जगदीश देशमुख व स्थानिक नागरिक तसेच स्थानिक दुकानदारांनी मागणी केली आहे

Previous articleनागपूर येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे मनुस्मृति दहन दिनानिमित्त स्त्रि मुक्ती परिषदेचे 25 डिसेंबरला कस्तुरचंद पार्क येथे आयोजन
Next articleघोरवड येथील श्री राम मंदिरात भरला बालगोपाळांचा मेळा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here