Home Breaking News !!गडचिरोली जील्हाच्या विकासासाठी व जवानांच्या पाठिशी संपुर्ण . !! उपमुख्यमंञी अजीत पवार

!!गडचिरोली जील्हाच्या विकासासाठी व जवानांच्या पाठिशी संपुर्ण . !! उपमुख्यमंञी अजीत पवार

29
0

!!गडचिरोली जील्हाच्या विकासासाठी व जवानांच्या पाठिशी संपुर्ण . !!
उपमुख्यमंञी अजीत पवार
गडचिरोली:गडचिरोली जिल्हातील विकासासाठी शरद पवार मुंख्यमंञी होते तेव्हा तसेच आर.आर.पाटिल पालकमंञी होते तेव्हापासुन तर आज पर्यत आम्ही या जिल्हाचा प्राधान्याने विचार केला आहे.येथील विकास कामांसाठी तसेच जवानाच्या पाठिशी गृहविभाग,अर्थ विभाग आहेत पंरतु संपुर्ण कँबिनेट संपुर्ण सरकार यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंञी अजीत पवार यांनी गडचिरोली येथे कार्यक्रमात दिली.ते पोलिस विभागातील विविध कार्यक्रमात उपस्थित राहाण्यासाठी आले होते.सी- 60 जवानांच्या सन्मान कार्यक्रमावेळी ते बोलत होते.अर्थमंञी या नात्याने आम्हाला गृह विभागा कडुन सि-60 जवानांच्या भत्त्यामधे वाढिचा प्रस्ताव आला होता तो तातडीने मंजुर केला.तसेच यापूर्वी नक्षल भागात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनातही वाढ केली आहे.आता गडचिरोलीतील सैन्य दलातील दवाखान्याच्या धतिवर सुसज्ज दवाखाना निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे.आरोग्य प्रतिपुति देयकांच्या यादित अकरा नविन आजारांचा समावेश केला आहे.अशा प्रकारे जवानांची सुरक्षा,चांगले आरोग्य व त्यांचे चांगले राहाणीमान यासाठी प्रयत्न करु असे ते पुढे म्हनाले .यावेळी राज्याचे गृहमंञी दिलिप वळसे पाटिल, आमदार धर्मरावबाबा आत्राम,जिल्हाअधिकरी संजय मीणा,पोलिस उप महानिरीक्षक संदिप पाटिल,पोलिस अधिक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्रीताई आञाम,व सि-60 जवानांचे पथकं उपस्थित होते.सी-60 जवानांच्या कार्यक्रमात आतापर्यत विविध चकमकित जवानांच्या चांगल्या योगदानाबदल प्रशस्तीपञक देऊन उपमुख्यमंञी अजीत पवार यांनी त्यांना सन्मानीत केले.यावेळी प्रत्येक जवानांशी मंचावर आल्यावर आदराने विचारपुस केली.व कौतुकाची थाप मारली.यावेळी बोलतांना ते मनाले मदिनटोला येथील नक्षल चकमक हि ऐतिहासीक घटना आहे याची नोंद पंतप्रधानांनी घेतली .मुख्यमंञी यांनी विशेष कौतुकही केले.राज्यात जिल्हात शांतता अंखड राहावी म्हणुन तुम्ही अहोराञ घेता यासाठी मी सर्व सी-60 जवानांना सलाम करतो असे गौरवोद्वार त्यांनी बोलतांना काढले.
राज्याचे गृहमंञी दिलिप वळसे पाटिल यांनी नक्षलवाद्याविरुध्द लढल असतांना आता सी-60 जवानाची नविन ओळख झाल्याचे म्हटले. नक्षलवाद्यांचा बिमोड करणारी टिम म्हणुन तुमच्याकडे पाहीले जाते.नक्षल चळवळीतील लोकांनमध्येही सी-60 पथकांमध्येही दरारा निर्माण झाला असल्याचे यावेळी म्हणाले कतव्याला श्रेष्ठ माननार्या जवानांसाठी आम्ही त्यांच्या भत्यामध्ये वाढ केली.आता पुढिल मागण्याही लवकरच पुर्ण करु यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्री सांहेबांना याबाबत सविस्तर माहीती देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले कार्यक्रमाचे प्रस्ताविक पोलिस उपमहानिरीक्षक संदिप पाटिल यांनी केले तर सुञसंचालन अतिरिक्त पोलीस अधीक्षक समिर शेख यांनी केले.कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी मानले.
!!रेल्वेच्या मार्गाच्या कांमासाठी मुंबईत बैठकिचे आयोजन!!
उपमुख्यमंञी अजीत पवार यांनी आपल्या भाषनात रेल्वे मार्गावर भाष्य केले.यासाठी जिल्हाअधिकारी,पोलिस अधिक्षक यांना उद्देशून पुढिल अडचणी सोडविण्यासाठी तातडिणे मुंबईला बैठक आयोजीत करु असे सांगीतले.यावेळी अडचणी,निधी तसेच कामे वेळेत कशी पूर्ण होतील याबाबत विचार विनिमय करु असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
!!कटेझरी पोलिस स्टेशनच्या नविन इमारतीचे उद्याटन!!
महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेवरच्या अतिदुर्गम गडचिरोली जिल्हाच्या धानोरा तालुक्याच्या कटेझरी पोलिस स्टेशनच्या नविन इमारतीचे उपमुख्यमंञी अजीत पवार यांच्या हस्ते उद्याटन झाले यावेळी गडचिरोली जिल्हाच्या धानोरा तालुक्यातील कटेझरी गावाच्या परिसरातील नागरिकांशी ,आरोग्य सेविका,आदिवासी बांधव,बालकांशीही उपमुख्यमंञी अजीत पवारांनी साधला संवाद.यावेळी उपस्थित मुलांशी त्यांनी शालेय स्तरावरील गप्पा मारल्या.तसेच नागरिकांनाही शेतीविषयक प्रश्न विचारले दैनदिंन स्वरुपात आदिवासी बांधवांचा दिनक्रम कसा चालतो चालतो याबाबत हि विचारणा केली.उपस्थितीतांना उपमुख्यमंञ्यांच्या हस्ते यावेळी विविध साहित्याचे वाटपही करण्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here