Home अमरावती अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे २.४ लाख हेक्टर बाधित, ६१० जनावरांचा मृत्यू, १४०...

अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे २.४ लाख हेक्टर बाधित, ६१० जनावरांचा मृत्यू, १४० घरांची पडझड, पंचनामे सुरू.

45
0

आशाताई बच्छाव

IMG_20231202_171052.jpg

अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे २.४ लाख हेक्टर बाधित, ६१० जनावरांचा मृत्यू, १४० घरांची पडझड, पंचनामे सुरू.
————-
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अवकाळी पावसाचा सामान्य माणसांना बसला फटका. अमरावती विभागात २६ नोव्हेंबर पासून सतत अवकाळी चा पाऊस अतिवृष्टी होत आहे. या चार दिवसात तब्बल २,०३,७६४ हेक्टर मधील पिकांना फटका बसला आहे. या आपत्तीमध्ये लहान मोठ्या ६१० जनावरांचा मृत्यू झाला तर १४० घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. या बाधित क्षेत्राचे पंचनामे आता सुरू झाले आहे. या आपत्तीमध्ये चार दिवसात ६१० शेळ्या, मेंढ्याचा बैल देखील मृत झाले २६ नोव्हेंबरला१८५शेळ्या,व मेंढ्या,२७ला २४४,२८ नोव्हेंबरला १३०,तर२९ नोव्हेंबरला ५१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अवकाळी च्या चार दिवसात १४० घराची पडझड झालेली आहे. यामध्ये २६ नोव्हेंबरला ५३,तर२७ नोव्हेंबरला २२तर२८ नोव्हेंबरला २६तर२९ नोव्हेंबरला २६ घरांची पडझड झाल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्राथमिक अहवाल आहे. अहो काळी मुळे चार दिवसात २,०३,७६४ हेक्टर मधील कपाशी, तुर, हरभरा,, भाजीपाला, कांदा, संत्रा, केळी आदी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here