आशाताई बच्छाव
चार तालुक्यात तब्बल २८ हजारे हेक्टर वरील शेत पिकाचे नुकसान: कापसाला प्रतिक्विंटल ५०० रुपयापर्यंत दर कमी मिळेल.
————
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
अमरावती जिल्ह्यातील दहा तालुक्यात ३३/: पेक्षा कमी नुकसान मुळे नोंदच नाही. मागील पाच दिवसापासून जिल्ह्यात कमी जास्त प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. परंतु जिल्ह्यातील चार तालुक्यातील २८ हजार ३९५ हेक्टरक्षेत्र वगळता इतर तालुक्यांमध्ये३३ टक्क्यापेक्षा कमी नुकसान असल्यामुळेच प्राथमिक नुकसानाची ही नोंद प्रशासनाने घेतली नाही. शासनाने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या २२ जिल्ह्याच्या पहिल्या यादीतून अमरावती जिल्ह्याला वगळले परंतु २९व३० नोव्हेंबरच्या अवहालात जिल्ह्यात सुमारे २८ हजार हेक्टर मध्ये प्राथमिक नुकसानाचे अंदाज जिल्हा प्रशासनाने दिवे आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी आणि धारणी तालुक्यातील २८ हजार ३९५ हेक्टर मधील कापूस तूर हरभरा या पिकाचे नुकसान झाले असून त्यामध्ये अंदाजे १०ते१२ हजार हेक्टर कपाशीचे क्षेत्र आहे. यासोबतच इतर अमरावती जिल्ह्यातील दाही तालुक्यात अवकाळी चा फटका बसला. परंतु नुकसानीच्या निकषात ३३ टक्के कमी नुकसान असल्यास त्याची नोंद केली जात नाही. मात्र हा निकष इतर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान करणारा ठरत आहे. सर्वाधिक नुकसान २९ नोव्हेंबरला झाल्याचे प्रशासनाकडून प्राप्त अहवालातून दिसून येते. यामध्ये अचलपूर तालुक्यात सर्वाधिक २० हजार ७७ हेक्टर, चांदूरबाजार तालुक्यात ६ हजार ३०४ हेक्टर, धारणी तालुक्यात १ हजार ९८५ हेक्टर आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यातील २६ हेक्टर मध्ये नुकसान झाले आहे. इतर तालुक्यात नुकसान नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. वास्तविक २६ नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला आहे. अवकाळी पाऊस आला त्यावेळी हजारो हेक्टर मध्ये कापूस फुटलेला होता. परंतु मजुरा आभावी शेत पांढरे झाले असले तरी वेचणी करणे शेतकऱ्यांना शक्य नव्हते. त्यामुळेच मागील पाच दिवसात जिल्ह्यातील लाखो क्विंटल कापूस झाडावरच ओला झाला. त्यामुळे आता पाऊस बंद झाल्यानंतर तो कापूस वेचून त्याला सोपवणे हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. मात्र कापूस सोपवाला तरीही जिल्ह्यात अवकाळी मुळे अनेक भागात नुकसान झाले. मात्र ३३ टक्क्यापेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणी नोंद झाली नाही. तसेच नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांना लक्षात आल्यास नुकसान झाल्यापासून ७२ तासाच्या आतमध्ये विमा कंपनीला टोल फ्री क्रमांक किंवा ऑप द्वारे तक्रार करावी असे राहुल सातपुते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी म्हटले. आज रोजी सध्या कापसाचा भाव सात हजार पर्यंत आहे. अवकाळी पावसामुळे अनेक शेतातील कापूस भिजल्याने कापूस काळसर किंवा पिवळा होतो. अशा कापसाला क्विंटल मागे ३००ते५०० रुपये भाव कमी मिळते. सध्या कापूस होलसर असल्यामुळे बाजारात प्रति क्विंटल ७ हजार पर्यंत भाव मिळत आहे. तसेच सध्या वातावरणामुळे आवक कमी असून दिवसाला केवळ ४००ते५०० असे राजू पणाने कापूस खरीदा यांनी सांगितले.
.






