Home माझं गाव माझं गा-हाणं ब्राम्हणगांव सब स्टेशनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार

ब्राम्हणगांव सब स्टेशनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार

91
0

राजेंद्र पाटील राऊत

ब्राम्हणगांव सब स्टेशनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार कृषीमंत्री दादा भुसे                                                                सटाणा,(जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)       सटाणा–ब्राह्मण गाव सबस्टेशन चा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज कृषी मंत्री माननीय नामदार दादभाऊ भुसे यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले असता माननीय ना.दादासाहेबभुसे साहेबांनी हा प्रश्न तत्काळ मार्गी लावू असे अभिवचन दिले या बरोबरच गावातील शेत शिवारात सिंगल फेज वीज पुरवठा, शेत शिवारात रस्ते,ब्राह्मण गाव – महाल पाटणे गावाला जोडणारा गिरणा नदीवर पुलाचे निर्माण करणे, बुध्द विहार सभामंडप पॅगोडा मंदिर निर्माण आदी कामं बद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य पप्पू तात्या बच्छाव, माजी सरपंच व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष आहिरे, नवनिर्वाचित सदस्य व मार्केट कमेटीचे माजी सदस्य किरण आहिरे, शिवसेनेचे संदीप आहिरे,नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आरपीआय तालुका अध्यक्ष बापुराज खरे, नवनिर्वाचित सदस्य विनोद आहिरे, नितीन आहिरे,प्रहार संघटनेचे रोशन आहिरे,नवनिर्वाचित सदस्य बापू माळी नवनिर्वाचित सदस्य केदा ढेपले, नवनिर्वाचित सदस्य जनार्धन सोनवणे,नवनिर्वाचित सदस्य शामराव माळी,कैलास आहिरे, पुंजाराम आहिरे, गौरव शिरोडे,रमेश आहिरे, भाऊसाहेब आहिरे, केवळ आहिरे, भगवान आहिरे,समाधान डांगळ आदी मालेगाव येथे उपस्थित होते.
या प्रसंगी नामदार दादाभाऊ भुसे यांना ब्राम्हणगावतील प्रलंबित सबस्टेशनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गावातील शिष्टमंडळाचे भेटी प्रसंगी माननीय ना.भुसे साहेबांनी वीज वितरण चे मुख्य कार्यकारी अभियंता सानप साहेब यांना फोन करून माहिती घेतली व तत्काळ प्रलंबित ब्राम्हणगाव सबस्टेशन चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सांगितले. सानप साहेबांनी येणाऱ्या काळात पहिलं काम ब्राम्हणगाव येथील सबस्टेशनचं काम हाती घेऊ असे आश्वासन दिले. याच बरोबर शेतशिवार सिंगल फेज योजना, शेत शिवार रस्ते, महालपाटने गिरणा नदीवर पुलाच काम इत्यादी कामं मार्गी लावण्यासाठी भुसे साहेबांना साकडे घातले व या प्रलंबित प्रश्न बाबत लवकरच कार्यवाहीचे आश्वासन दिले.

Previous articleअभासेच्या सरचिटणीस आशाताई गवळींचा “कोव्हिड सोल्जर” म्हणून गौरव
Next articleदेवळा शहरात चिकन फेस्टीवल उत्साहात संपन्न! 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here