Home माझं गाव माझं गा-हाणं देवळा शहरात चिकन फेस्टीवल उत्साहात संपन्न! 

देवळा शहरात चिकन फेस्टीवल उत्साहात संपन्न! 

84
0

राजेंद्र पाटील राऊत

देवळा शहरात चिकन फेस्टीवल उत्साहात संपन्न!
(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा:- देवळा तालुका पोल्ट्री असोसिएशन मार्फत देवळ्यात चिकन फेस्टिवल उत्साहात.
बर्ड फ्लूच्या अफवेमुळे नागरिकांच्या मनातील भीती घालविन्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर हे होते.तसेच बर्ड फ्लू विषाणूचा प्रसार कुक्कुट पक्षयांचे मांस,अंडी किंवा मासे यांच्या मार्फ़त होत नसून चिकन खाल्ल्याने शरीरात प्रथिनांची कमतरता जाणवत नाही.त्यामुळे चिकन ,अंडी बिनधास्त खाण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांनी केले.
यावेळीभारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर,जितेंद्र आहेर,तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ,आनंद एग्रोचे चेअरमन उद्धव आहेर,देवळा नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष अतुल पवार, देवळा नगर पंचायतीचे मुख्य अधिकारी संदीप भोळे,भाऊसाहेब पगार,देवळा पशुसंवर्धन अधिकारी विष्णु झांबरे,देवळा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संजय मातोंडकर,देवळा पंचायत समितिचे गटविकास अधिकारी राजेश देशमुख,देवळा तालुका डॉक्टर्स असोसिएशन यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

Previous articleब्राम्हणगांव सब स्टेशनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार
Next articleनांदेड/दिवशी बु.येथील निरागस चिमुकलीचा अत्याचारी खुनी नराधमास दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फाशी द्या ;
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here