• Home
  • नांदेड/दिवशी बु.येथील निरागस चिमुकलीचा अत्याचारी खुनी नराधमास दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फाशी द्या ;

नांदेड/दिवशी बु.येथील निरागस चिमुकलीचा अत्याचारी खुनी नराधमास दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फाशी द्या ;

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210122-WA0037.jpg

नांदेड/दिवशी बु.येथील निरागस चिमुकलीचा अत्याचारी खुनी नराधमास दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फाशी द्या ; सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी केली गृहमंत्र्यांकडे मागणी

नांदेड,२३- राजेश एन भांगे

दि. २१ जानेवारी २०२१
नांदेड जिल्ह्यातील, दिवशी ( बु ) तालुका भोकर येथे पाच वर्षांच्या निरागस चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी बलात्कार करून व तिचा खुन करून मृतदेह नदीपात्रात टाकले,
सविस्तर असे की दिवशी बु. गावातील शेतकऱ्याची ५ वर्षांची निरागस चिमुकली आहे, दि.२० जानेवारी २०२१ रोजी दुपारी १२:०० वाजतापासून मुलगी घरी नसल्याने तिचा शोध घेणे सुरू केले, परंतु ती मिळाली नसल्याने कुटूंबीयांनी याबाबतची माहिती भोकर पोलीसात दिली.तसेच शोध सुरू ठेवला असता त्यांच्या शेतात काम करणारा सालगडी वय ३५ हा नराधम मुलीला पळवून नेले,असावे असा शंयश व्यक्त होत असल्याने शोध मोहीम सुरूच ठेवली याच दरम्यान सायंकाळी त्या चिमुकलीचा नि वस्त्र व गंभीर अवस्थेतील मृतदेह दिवशी बु.पासून काही अंतरावर तेलंगणा राज्य सीमे सुधा नदी पात्रतात सापडला,हि दुदैवी घटना दुुपारी २:००ते ६:०० वाजता च्या दरम्यान घडली असून त्या नराधमास भोकर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे, सदरील प्रकरणातील आरोपी असलेल्या नराधमास तात्काळ नवीन दिशा कायद्यानुसार २१ दिवसात फाशीची शिक्षा देऊन पिडीत चिमुकली व तिच्या कुटूंबियास न्याय द्यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी केले राज्याच्या गृह मंत्र्यांकडे मागणी, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, अमानवी आहे,देशाच्या कानाकोपऱ्यात दररोज अन्याय अत्याचार होत आहे, ही खेदाचीत बाब आहे, त्यामुळे देशात व राज्यात महीला मध्ये भितीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे, जोपर्यंत अशा नराधमास फासावर लटकवून फाशी दिली जात नाही तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत यासाठी अस्या नराधमास तात्काळ नवीन नवीन दिशा कायद्यानुसार 21 दिवसात फासावर लटकवून फाशी दिली पाहिजे असे निषेधार्थ मत सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले,

anews Banner

Leave A Comment