Home उतर महाराष्ट्र शनिशिंगणापूर देवस्थानच्या कथित भ्रष्टाचारासंदर्भात भाजप श्रेष्ठींचं ठोस आश्वासन ; ऋषिकेश शेटे पाटील...

शनिशिंगणापूर देवस्थानच्या कथित भ्रष्टाचारासंदर्भात भाजप श्रेष्ठींचं ठोस आश्वासन ; ऋषिकेश शेटे पाटील यांचं उपोषण दुसऱ्या दिवशी मागे

135
0

आशाताई बच्छाव

IMG_20231202_170439.jpg

नेवासा तालुका प्रतिनिधि कारभारी गव्हाणे शनिशिंगणापूर देवस्थानच्या कथित भ्रष्टाचारासंदर्भात भाजप श्रेष्ठींचं ठोस आश्वासन ; ऋषिकेश शेटे पाटील यांचं उपोषण दुसऱ्या दिवशी मागे

शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये सुरु असलेल्या शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, प्रशासनाचा गैरवापर यावर आळा घालण्यासाठी शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करुन हे देवस्थान सरकार जमा करावं आणि याठिकाणी त्वरित प्रशासक नेमण्यात यावा, अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे पाटील यांनी सहकाऱ्यांसमोर कालपासून (दि. ३०) सुरु केलेलं आमरण उपोषण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर आज (दि. १) दुसऱ्या दिवशी मागे घेतलंय.
काल (दि. ३०) सायंकाळी साडेसहा वाजता सुरु झालेल्या या उपोषणात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, अशोक टेमक, बेल्हेकरवाडीचे सरपंच भरत बेल्हेकर, कांगोणीचे माजी सरपंच बंडू भाऊ शिंदे, सतीष गडाख संदीप कुसळकर, प्रतिक शेजूळ, सचिन भांड, अमोल साठे, प्रताप चिंधे, नानासाहेब ढेरे, संदीप दरंदले, संभाजी गडाख, अरुण चांदघोडे, भाऊसाहेब बेल्हेकर, गणेश चौघुले, कुशीनाथ ढेरे, ज्ञानदेव ढेरे, संभाजी राशिनकर, प्रकाश ढेरे, बाळा साबळे, हर्षद शिरसाठ आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे ऋषिकेश शेटे पाटील यांनी हे उपोषण मागे घेतलं असून शेटे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या उपोषणाला घवघवीत यश आल्याचं बोललं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here