• Home
  • शरद पवारांकडून माढा काढून घेतले आता पंढरपूर देखील राष्ट्रवादीला मिळू देणार नाही ‘

शरद पवारांकडून माढा काढून घेतले आता पंढरपूर देखील राष्ट्रवादीला मिळू देणार नाही ‘

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210407-WA0078.jpg

शरद पवारांकडून माढा काढून घेतले आता पंढरपूर देखील राष्ट्रवादीला मिळू देणार नाही ‘
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप
पंढरपूर : पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं २८ नोव्हेंबर रोजी निधन झालं . भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे . यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे .राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे . तर , भाजपने भगीरथ भालके यांच्या विरोधात समाधान आवताडे मैदानात उतरवलं आहे . भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मुख्य सामना होणार आहे .दिवसेंदिवस या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे . भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराची धुरा भाजपचे माढा मतदारसंघातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खांद्यावर आहे . त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात ते तळ ठोकून आहेत .
दरम्यान , खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरच शरसंधान साधले आहे . ‘ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून जशी माढा लोकसभा मतदारसंघाची जागा काढून घेतली , तशी पंढरपूर विधानसभेची जागा पुन्हा राष्ट्रवादीला मिळू देणार नाही ‘ . अशी सिंहगर्जना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे .

anews Banner

Leave A Comment