• Home
  • इचलकरंजी शहरातील दुकाने केली बंद

इचलकरंजी शहरातील दुकाने केली बंद

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210407-WA0089.jpg

इचलकरंजी शहरातील दुकाने केली बंद

पेठ वडगांव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी
शहरातील सर्व दुकाने डिवायएसपी बी.बी. महामुनी यांनी बंद केली.
राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ असुन याच अनुशंघाने राज्य सरकारने काही नियमावली घालून शहरातील उद्योगधंदे बंद सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते.
इचलकरंजी शहरातील आज डिवायएसपी महामुनी यांनी सर्व दुकाने बंद केली.
अत्यावश्यक सेवा (बेकरी, किराणा ,औषधे,) वगळता बाकी सर्व दुकाने बंद करण्यास सांगितले .
विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली. आज इचलकरंजी शहरात अचानकपणे कारवाई केल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दिवसभर जमावबंदी आदेश आणि रात्री संचारबंदी आदेश राज्य सरकारने लागू केले आहेत . पण आज सकाळी ११ वाजलेपासुन गांधी पुथळा येथून शहरातील मुख्य रोडवरील सर्व अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने बंद केली.
यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे
पोलीसांनी अचानक केलेल्या कारवाईमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे हा लाँकडाँऊन आहे कि काय असा सवाल शहरातील नागरिकांतून होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सद्याचे कोरोनाचे संकट कमी प्रमाणात आढळुन येत असुन याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे .कोरोना संसर्ग वाढूनये याकरीता ही उपाययोजना इचलकरंजी पालिका , महसुल, व पोलीस प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे कठोर निर्बंध आणून सर्वसामान्य नागरीकांनी ,व्यापाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. (युवा मराठा न्युज नेटवर्क कोल्हापूर विभाग)

anews Banner

Leave A Comment