Home मराठवाडा तलवाडा घाट ते शिऊर बंगला महामार्ग लवकर दुरुस्त करा. अन्यथा तिव्र आंदोलन...

तलवाडा घाट ते शिऊर बंगला महामार्ग लवकर दुरुस्त करा. अन्यथा तिव्र आंदोलन . छावा संघटना. —————————————-

121
0

राजेंद्र पाटील राऊत

तलवाडा घाट ते शिऊर बंगला महामार्ग लवकर दुरुस्त करा. अन्यथा तिव्र आंदोलन . छावा संघटना.

—————————————-
ब्युरो चिफ:बबन निकम औरंगाबाद

सोलापूर, धुळे महामार्गावरील वाहतूक तलवाडा घाटामार्गे वळविण्यात आली आहे. आधीच परिसरातील रस्ते अरुंद, जागोजागी पडलेल्या असंख्य खड्डे ,त्यातच जड वाहनांची वर्दळ वाढल्याने या मार्गावर नियमीत बारा बारा तास वाहतूक खोळंबत आहे. यामुळे परिसरातील वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अखिल भारतीय छावा संघटनेच्या व हि.ज.क्रां.संघटनेच्या वतीने दुरुस्ती ची मागणी सा.बां.विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
औरंगाबाद मालेगाव महामार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी कायम असल्याचे दिसून येत आहे.त्यातच मनमाड येथून अतिशय ज्वलनशिल पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर , ॲसिड ,केमिकल भरुन वाहने मराठवाड्यात प्रवेश करतात. धुळे सोलापूर महामार्गावरील वाहतूक तलवाडा घाटा मार्गे वळविण्यात आल्याने अरुंद रस्त्यावरील वाहतुकीची गर्दी बघता रोज तलवाडा घाटा पासून ते वेरुळ फाट्या पर्यंत खड्डे चुकवत वाहन अरुंद पूलाच्या कठडावरुन किंवा खड्ड्यात रात्रीच्या वेळी रोज दोन-तीन अपघात होतांना दिसतात. आता पर्यंतच्या घटनेत सुदैवानं कुठलीही जीवित हानी झाली नाही .परंतु अत्यंत ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या वाहनांना अचानक अपघात होऊन काही अनिष्ट घडले तर कित्येक वाहने यात नष्ट होण्याची भीती असल्याने बांधकाम विभागाने या अरुंद खड्डेमय रस्त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे वाहन चालक व छावा संघटनेचे किशोर मगर आणि हि.ज.क्रां.सेनेचे अजय पाटील , चंद्रशेखर साळुंके, संतोष निकम यांनी स्वाक्षऱ्या सह निवेदन सादर केले आहेत.

Previous articleमाजी सैनिक जगन्नाथ ढोले यांचे निधन
Next articleनवरात्रौत्सव साजरा करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करा – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here