Home विदर्भ मनविसेच्या भोटा ते कालवड पर्यंत रस्ता दुरुस्तीसाठीचे उपोषण लेखी आश्वासनानंतर तुर्तास स्थगित

मनविसेच्या भोटा ते कालवड पर्यंत रस्ता दुरुस्तीसाठीचे उपोषण लेखी आश्वासनानंतर तुर्तास स्थगित

74
0

आशाताई बच्छाव

IMG-20220929-WA0035.jpg

मनविसेच्या भोटा ते कालवड पर्यंत रस्ता दुरुस्तीसाठीचे उपोषण लेखी आश्वासनानंतर तुर्तास स्थगित
जि.प.बांधकाम उपविभागीय अभियंता विजय मोरे साहेब, शाखा अभियंता सोळंके साहेब यांनी दिले लेखी आश्वासन

मलकापूर : भोटा ते कालवड पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून ठिकाणी या रस्त्यावर खड्डे पडलेले असून संबंधित बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले होते. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने वेळोवेळी निवेदने देऊनही त्याची दखल न घेतल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने दिनांक २८/९/२०२२ रोजी जि. प. एसडीओ कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. सदर उपोषण मनसे माथाडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीकृष्ण सपकाळ, मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर, मनविसे जिल्हा सचिव राहुल चोपडे, तसेच मनसेच्या अंगिकृत संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने व गावकरी मंडळी भोटा यांच्या वतीने करण्यात आले असता जि. प. मलकापूर उपविभागीय अभियंता विजय मोरे साहेब व शाखा अभियंता श्री सोळंके साहेब यांनी लेखी आश्वासन दिल्याने सदर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असुन सदर रस्ता दुरुस्ती न झाल्यास जि. प. बांधकाम विभाग बुलढाणा यांच्या विरोधात तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपोषण कर्त्यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीकृष्ण सपकाळ, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव राहुल चोपडे, मनसे मलकापूर ता. अध्यक्ष पंकज पाटील, गणेश ठाकूर, मनविसे ता. अध्यक्ष गणेश जैस्वाल, शहर अध्यक्ष निखिल पोंदे, भोटा ग्रामपंचायत सरपंच प्रविण कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य दामोदर घुळे,दिपक जाधव, गजराज साळुंखे, कृष्णा चंदनशिव, प्रेम तायडे, उदय वानखेडे, लक्ष्मण पारस्कर, रामा डामरे, वैभव सपकाळ, विनायक पारस्कर, गणेश मानकर, भागवत पारस्कर, वैभव पारस्कर, यांचे सह मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते व भोटा गावकरी आदी उपस्थित होते.

Previous articleचिखली प्राधिकरण येथे मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड ; अपना वतन संघटनेची तक्रार
Next articleरिपब्लिकन पक्ष फक्त राजकीय पक्ष नाही ते जन आंदोलन आहे– बाळासाहेब खोब्रागडे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here