Home नांदेड नरसिंह विद्यामंदिर उमरदरी येथे तालुका विधि सेवा समिती मुखेड मार्फत कायदे विषयक...

नरसिंह विद्यामंदिर उमरदरी येथे तालुका विधि सेवा समिती मुखेड मार्फत कायदे विषयक शिबिर संपन्न

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20220814-WA0003.jpg

नरसिंह विद्यामंदिर उमरदरी येथे तालुका विधि सेवा समिती मुखेड मार्फत कायदे विषयक शिबिर संपन्न

मुखेड तालुका प्रतिनिधी
संग्राम पाटील तांदळीकर

मुखेड तालुक्यातील नरसिंह विद्यामंदिर उमरदरी येथे तालुका विधी सेवा समिती मुखेड मार्फत आजादी का 75 वा अमृत महोत्सवानिमित्त कायदेविषयक साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिरिक्त मा जिल्हा न्यायाधीश श्रीमती स्वर्णिता महाले मॅडम प्रमुख पाहुणे मा सहदिवानी न्यायाधीश श्री एन एस बारी साहेब कनिष्ठ स्तर मुखेड मा दिवानी न्यायाधीश श्री एम एस पोळ साहेब कनिष्ठ स्तर मुखेड अँड एम बी कदम साहेब मुखेड न्यायालयातील कर्मचारी ए बी वाघमारे कनिष्ठ लिपिक श्री एस बी गजभारे कनिष्ठ लिपिक श्री एन डी ताटे न्यायालयीन कर्मचारी श्री टी एस कांबळे पोलीस कर्मचारी आगमना प्रसंगी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी होऊन कार्यक्रम स्थळी पोचले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री एन डी पांडे यांनी केली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा न्यायाधीश बारी साहेबांनी भाषणातून शाळेतील सर्व कर्मचारी विद्यार्थ्यांना कायद्याचे महत्त्व सांगून समस्या निर्माण झाल्यास त्या सोडवण्यासाठी शाळेतील शिक्षकाकडे जवळच्या पोलीस स्टेशन कडे व न्यायालयात तक्रार नोंदवावी यातून आपणाला कायदेशीर न्याय मिळेल असे विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषणातून अतिरिक्त मा जिल्हा न्यायाधीश स्वर्णिता बा माहले मॅडम विद्यार्थ्यांच्या जीवनातील उदाहरणे देऊन अत्यंत सोप्या व सुलभ भाषेत कायदेशीर ज्ञान सांगून सर्वांनाच कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आजादी का 75 वा अमृत महोत्सवानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती राष्ट्रीय एकात्मता दर्शवणारी विविध चि त्रे निरक्षण मान्यवरांनी केली मान्यवराच्या हस्ते शाळेतील प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमात विद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षणतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एन डी गुडूरवार यांनी केली तर आभार श्री डी के मोरे यांनी मांडले

Previous articleपिंपरी चिंचवड शहर कार्यालय दापोडी भागात हर घर तिरंगा अभियान अंतर्गत राष्ट्रध्वज वाटप
Next articleशिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंचं अपघाती निधन; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गाडीला भीषण अपघात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here