Home मुंबई शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंचं अपघाती निधन; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गाडीला भीषण अपघात

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंचं अपघाती निधन; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गाडीला भीषण अपघात

48
0

आशाताई बच्छाव

IMG-20220814-WA0025.jpg

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंचं अपघाती निधन; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गाडीला भीषण अपघात

मुंबई (अंकुश पवार,प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्यूज चॅनेल अँड पेपर)

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात होऊन त्यांचं निधन झाल्याची घटना घडली आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामध्ये विनायक मेटेंना गंभीर जखमी अवस्थेत कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे. विनायक मेटे आपला एक सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. आज दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईला येत होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर एमजीएम रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले.
विनायक मेटेंच्या डोक्याला मागच्या बाजूस गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. मराठा समाज नेहमीच सत्तेतला मानला गेला. पण या राज्यात मराठा शेतकरी, शेतमजूर आहेत. त्या समाजाला न्याय देणारा चेहरा म्हणजे विनायक मेटे होते. आता सत्ता पुन्हा आल्यानंतर त्या समाजासाठी काही करण्याची संधी त्यांना उपलब्ध झाली होती. त्यांचं असं अचानक जाणं हे या समाजाचं मोठं नुकसान आहे.

Previous articleनरसिंह विद्यामंदिर उमरदरी येथे तालुका विधि सेवा समिती मुखेड मार्फत कायदे विषयक शिबिर संपन्न
Next article‘शेअर मार्केट किंग’ अशी ओळख असलेल्या राकेश झुनझुनवालांचे निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here