Home बीड मराठवाड्यातील सर्व ठेवीदारांना न्याय मिळेपर्यंत लढा चालूच राहणार

मराठवाड्यातील सर्व ठेवीदारांना न्याय मिळेपर्यंत लढा चालूच राहणार

26
0

आशाताई बच्छाव

IMG_20240221_075642.jpg

मराठवाड्यातील सर्व ठेवीदारांना न्याय मिळेपर्यंत लढा चालूच राहणार

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड दि:२०  सर्व ठेवीदारांची एकी आणि सर्वसामान्यासाठी हातात घेतलेला लढा यामुळे आपल्याला काही अंशी यश मिळाले आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या वतीने उद्याच्या ०५ मार्चपासून ठेवी वाटपाला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले असून जे लोकं ठेवीदारांचे पैसे देणार अशांचा आम्ही जाहीर सत्कार करू परंतु वेळ जर पाळली नाही तर गाठ जनतेशी आणि माझ्याशी राहील असा इशाराही प्रा. उबाळें यांनी दिला आहे. मराठवाडा दौऱ्या प्रसंगी शिरूर येथील गाठीभेटी दौऱ्यावेळी प्रा. उबाळे बोलत होते. यावेळी हजारो ठेवीदारांची त्यांनी संपर्क केला असून सर्वांच्या ठेवी परत मिळेपर्यंत लढा चालूच राहील असेही त्यांनी सांगितले आहे. सर्वसामान्यांच्या ठेवी मिळवण्यासाठी बीड स्वाभिमान संघटनेच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जिजाऊ, ज्ञानराधा, राजस्थानी, साईराम, मराठवाडा अर्बन (माजलगाव), मातोश्री, परिवर्तन, लक्ष्मीमाता, शुभकल्याण, द्वारकादास नागरी सह. बँक यासह इतरही काही बँकांचा व्यवहार संशयास्पद आढळून येते असल्याची चर्चा सुरू झाली आणि बघता बघता बीड जिल्ह्यातील सहकारातील वातावरण गढूळ झाले. तब्बल ०७ दिवसांचे आमरण उपोषण केल्यानंतर बँकवाल्यांना जाग आली त्यांनी ठेवीदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू केला. विशेष म्हणजे काहींनी ठेवी तात्काळ वाटप सुरू केली परंतु ती पुरेशी नाही. ज्ञानराधाच्या बाबतीत सुरेश कुठे यांनी देखील पुढे होऊन त्यांचे पैसे आले आहेत आता उद्याच्या ०५ मार्च पासून सर्वांना पैसे मिळतील असे सांगितले आहे. खरंच त्यांनी ०५ मार्चला पैसे वाटप चालू केले तर आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांचा जाहीर सत्कार करू. त्यांचाच नाही तर ज्या कोणी बँकवाल्यांनी सर्वसामान्यांचे पैसे अडकून ठेवले आहेत आता वाटप चालू करणार आहेत. त्यांना आम्ही भेटून त्यांचे स्वागत करू असेही प्रा. उबाळे यांनी म्हटले आहे. परंतु अगोदर सर्वसामान्य ठेवीदार खूप अडचणीत आलेले आहेत. संपूर्ण मराठवाडा दौरा केल्यानंतर त्यांचे दुःख, यातना आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहितल्या आहेत. भविष्यामध्ये कुठल्याही बँकेवर विश्वास ठेवताना आता लोक विचार करणार हे मात्र निश्चित आहे.

Previous articleमराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी मायबोली मराठी अस्मिता जोपासली जावी
Next article21 फेब्रुवारी पासून बारावीची परीक्षा ; संवेदनशील 28 केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here