Home मुंबई तोरणा प्रवेशद्वाराचे भूमीमुजन

तोरणा प्रवेशद्वाराचे भूमीमुजन

30
0

आशाताई बच्छाव

IMG_20240302_074903.jpg

तोरणा प्रवेशद्वाराचे भूमीमुजन

मुंबई : प्रतिनिधी विजय पवार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परपर्शाने पावन झालेली त्यावेळची ‘डबक चाळ’ आणि आत्ताची डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर.या नगराचे एस.आर. ए. योजने अंतर्गत सन २००९ मध्ये पुनर्वसन झाले, त्यावेळेपासून या पुनर्वसन कामाचे नगराचे विकासक यानी तोरणा गेट बांधून देण्याचे आश्वासन देऊन सुध्दा आजपर्यंत ते झाले नाही म्हणून येथील ज्येष्ठ नागरिक यांनी वडाळा विधानसभेचे आमदार श्री. कालीदास कोळंबकर यांच्याकडे गेली काही वर्ष पाठपुरावा केला. या कार्यास नगराचे रहिवाशी व भाजप उपाध्यक्ष जितेंद्र कांबळे यानी विशेष सहकार्य केले व भव्यदिव्य तोरणा प्रवेशद्वार बांधण्याचे नक्की झाले. हे भूमीपुजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परेल येथे स्थानिक आमदार श्री. कोलंबकर साहेबांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी “डॉ.बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा घेणारा याच समाजाचा मी पण एक घटक आहे हे कार्य करायला मिळाले हे माझे भाग्यच असल्याचे ” असे उदगार त्यांनी काढले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना उपाध्यक्ष जितेंद्र‌ कांबळे यानी मी ज्या नगरात वाढलो तिथले येवढे मोठे काम करण्यात माझा वाटा आहे याचे मला समाधान वाटते असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास नगरातील सोसायटीचे ज्येष्ठ पदाधिकारी, रहिवाशी, महिला पदाधिकारी, भाजपचे जिल्हा स्तरीय पदाधिकारी तालुका पदाधिकारी, तसेच इतर रहिवाशी उपस्थितीत होते.
सदर कार्यक्रमामध्ये नगराचा विकासापासून आजपर्यंतची सविस्तर माहिती, मान्यवरांचा मान सन्मान व अतिशय मधुर शब्दांत सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार प्रदर्शन विजय झिमुर यांनी केले.

Previous articleपरळी येथील २१० मेगावॅट प्रकल्पाची चिमणी जमीनदोस्त कशामुळे करण्यात आली; ६६० मेगावॅटचा प्रकल्प उभा करावा- अँड.मनोज संकाये
Next articleमोफत पोलीस भरती शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन: डॉ. पंडित तुपे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here