Home बीड मोफत पोलीस भरती शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन: डॉ. पंडित तुपे

मोफत पोलीस भरती शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन: डॉ. पंडित तुपे

20
0

आशाताई बच्छाव

IMG_20240302_075614.jpg

मोफत पोलीस भरती शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन: डॉ. पंडित तुपे

मोहन चव्हाण ब्युरो चीफ 

बीड दि:०१  महाराष्ट्रात पोलीस भरतीच्या १७,४७१ पदासाठी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती आता ह्या पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. दि ०१ मार्चपासून जिल्हानिहाय पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध होऊन ०५ मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. १२ पास असलेल्या मुला – मुलींना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील गरीब, होतकरू मुला मुलींना आपले पोलीसात भरती होण्याचे स्वप्न साकार करता यावे म्हणून ०८ मार्च २०२४ महिला जागतिक दिनानिमित्त युवकक्रांती दल व जय हिंद डिफेन्स अकॅडमी बीड यांच्या संयुक्त विद्यमाने ०३ मार्च ते ०५ मार्च २०२४ या दरम्यान चाणक्य मंडळ गिराम कॉम्प्लेक्स, वाघमारे हॉस्पिटल च्या बाजूला डीपी रोड बीड येथे मोफत पोलीस भरती शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ९४०३९५९४५४ या मोबाईल क्रमांकावर नाव नोंदणी करणे आवश्यक राहील. मोफत पोलीस भरती शिबिरामध्ये पोलीस भरतीच्या उमेदवारांनी अर्ज कसा करावा? कोणत्या जिल्ह्यात अर्ज करावा, अर्ज करताना काय काळजी घ्यावी. कागदपत्रे कोणती असावीत अशा सर्व प्रकारच्या माहिती बरोबरच ग्राउंड ची तयारी कशी करावी लेकी अभ्यासक्रमातील गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास करून पैकीच्या पैकी मार्क मिळवून आपले पोलीस भरतीचे स्वप्न साकार करण्यासाठी तळागाळातील सर्व उमेदवारांनी हजारोंच्या संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान युवक क्रांती दल संघटनेचे जिल्हाअध्यक्ष डॉ .पंडित तुपे यांनी केले आहे.

Previous articleतोरणा प्रवेशद्वाराचे भूमीमुजन
Next articleपुणे लोकसभा बूथ प्रमुख व पदाधिकारी संमेलन संपन्न !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here