Home बीड परळी येथील २१० मेगावॅट प्रकल्पाची चिमणी जमीनदोस्त कशामुळे करण्यात आली; ६६० मेगावॅटचा...

परळी येथील २१० मेगावॅट प्रकल्पाची चिमणी जमीनदोस्त कशामुळे करण्यात आली; ६६० मेगावॅटचा प्रकल्प उभा करावा- अँड.मनोज संकाये

34
0

आशाताई बच्छाव

IMG_20240301_085826.jpg

परळी येथील २१० मेगावॅट प्रकल्पाची चिमणी जमीनदोस्त कशामुळे करण्यात आली; ६६० मेगावॅटचा प्रकल्प उभा करावा- अँड.मनोज संकाये

मोहन चव्हाण
प्रतिनिधी परळी वैजनाथ

परळी दि: २९  रोजी परळी वैजनाथ येथील २१० प्लांट याची मुदत २०२५ पर्यंत असून या प्लांटची चिमणी जमीनदोस्त करण्यात आली आहे. ही चिमणी चाळीस वर्ष जुनी आहे. परळी वैजनाथ या ठिकाणी सौर ऊर्जा प्लांट बसवण्याचे बोलले जात आहे परंतु त्या ऐवजी ६६० मेगावॅटचा प्रकल्प उभा करावा यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे परंतु त्याचा अभाव दिसत आहे. असे झाल्यास याचा परिणाम थेट परळीच्या रोजगारावर होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे परळीतील दोन्हीही दिगज नेत्यांनी प्रकल्पासाठी इच्छाशक्ती दाखवावी आणि प्रकल्प सुरू करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी केली आहे. महाराष्ट्रातील नाशिक, कोराडी, भुसावळ आणि खापरखेडा येथील २१० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प सुरू आहेत विशेष म्हणजे हे प्रकल्प परळीच्या प्रकल्पाच्या नंतरचे आहेत ते अजूनही त्याच क्षमतेने सुरू आहेत मग परळीचे प्रकल्प बंद का? याला जबाबदार कोण आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. परळीमध्ये मोठे प्रकल्प नसल्यामुळे युवकांना रोजगार मिळत नाही. प्रकल्प आल्यावर युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. परळीचा धबधबा हा राज्यात कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या रूपाने तर केंद्रात खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या रूपाने आहे याचा फायदा परळीकरांना मिळवून देण्यासाठी या दोन्हीही नेत्यांनी आपले वजन वापरून नवीन प्रकल्प आणावीत त्यामुळे तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. ६६० मेगावॅट प्रकल्प मंजूर झाल्यास रोजगाराच्या समस्या मिळतील आणि शहराला चांगले दिवस येतील त्यामुळे प्रकल्प मंजूर करावा अशी मागणी त्यांनी केली.

Previous articleमाझा भारत महान
Next articleतोरणा प्रवेशद्वाराचे भूमीमुजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here