Home नांदेड प्लास्टिकमुक्त उपक्रमात ग्रामसेवकांकडून 22 किलो प्लास्टिकचे संकलन

प्लास्टिकमुक्त उपक्रमात ग्रामसेवकांकडून 22 किलो प्लास्टिकचे संकलन

117

आशाताई बच्छाव

IMG_20240112_110023.jpg

प्लास्टिकमुक्त उपक्रमात ग्रामसेवकांकडून 22 किलो प्लास्टिकचे संकलन                                            लोहा,(प्रतिनिधी अंबादास पाटील पवार)

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा यावर्षीची यात्रा प्लास्टिकमुक्त व कचरामुक्तीचा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

ही संकल्पना साक्षात उतरवण्यासाठी लोहा तालुक्यातील ग्रामसेवक बांधवांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेऊन प्लास्टिक व कचरामुक्तीसाठी 10 जानेवारी रोजी सर्व ग्रामसेवकांनी मिळून 22 किलो प्लास्टिकचे संकलन केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उप मुख्य कार्यकारी मंजूषा जाधव, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले.

या उपक्रमात एकाच दिवसात 22 किलो प्लास्टिक कचऱ्याचे संकलन केले. या उपक्रमामध्ये गट विकास अधिकारी डी. के. आडेराघो, विस्तार अधिकारी धनंजय देशपांडे, डी.आय. गायकवाड, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष गजानन शिंदे, सचिव शैलेश बिस्मिले, उपाध्यक्ष रमेश राठोड, अमृत शिंदे, हरिहर विश्वासराव, शरद गीते, कृषी पदवीधर संघटनेचे तालुकाध्यक्ष अरुण चौधरी, संदीप कछवे, सचिव सय्यद इब्राहिम, सौ. लींगापुरे, सौ. पांचाळ, सौ. टोम्पेसह तालुक्यातील ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleशिंदे सरकारच्या बाजूने लागलेल्या निकालाचा चाळीसगाव येथे जल्लोष
Next articleजिल्हा परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे विमोचन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.