Home नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे विमोचन

जिल्हा परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे विमोचन

107

आशाताई बच्छाव

IMG_20240112_111247.jpg

जिल्हा परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे विमोचन

लोहा प्रतिनिधि
अंबादास पाटिल पवार

श्री क्षेत्र माळेगाव यात्रा संदर्भात नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे माळेगाव येथे आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त राजकुमार पडिले, डॉ. प्रविण घुले, तहसीलदार शंकर लाड आदींची उपस्थिती होती.
या कॉफी टेबल बुकमध्ये माळेगाव यात्रेची ऐतिहासिक पंरपरा, आख्यायिका, पालखी सोहळा, लोककला, यात्रा मार्ग, दिशादर्शिका, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे शुभेच्छा संदेश. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची प्रास्तावना आहे.
चारशे वर्षाची परंपरा लाभलेल्या माळेगाव यात्रेची माहिती व्हावी या उद्देशाने नांदेड जिल्हा परिषदेने माळेगाव यात्रेसंदर्भात कॉफी टेबल बुक काढले आहे.

Previous articleप्लास्टिकमुक्त उपक्रमात ग्रामसेवकांकडून 22 किलो प्लास्टिकचे संकलन
Next articleदिवंगत भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेबांचा व नाही रे वाल्यांचा वारसा आयुष्यभर चालवणार -प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.