Home नांदेड दिवंगत भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेबांचा व नाही रे वाल्यांचा वारसा आयुष्यभर...

दिवंगत भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेबांचा व नाही रे वाल्यांचा वारसा आयुष्यभर चालवणार -प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे

33
0

आशाताई बच्छाव

IMG_20240112_111651.jpg

दिवंगत भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेबांचा व नाही रे वाल्यांचा वारसा आयुष्यभर चालवणार -प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे

लोहा प्रतिनिधि
अंबादास पाटिल पवार

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व आमदार डॉ.भाई केशवरावजी धोंडगे साहेबांनी श्रीक्षेत्र माळेगाव खंडेरायाच्या यात्रेत 1952 पासून दरवर्षी लाल बावटा कॅम्प च्या माध्यमातून विविध परिषदा घेऊन यातून शेतकरी गुराखीराजा सालदार राजा ,भटके, वाघ्या मुरळी ,देवकर ,देवकरीण माता, पोतराज ,शाहीर ,तमासगीर, नाहीरेवाले, पतहिनाचेप्रश्न ठराव रूपाने मांडून शासनाकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला आहे सुग्यामुग्याना नाही रे वाल्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला व माळेगाव यात्रेतील जाचक कर सुविधांचा अभाव नष्ट करून यात्रा वाढवण्याचे कार्य केले भाई धोंडगे साहेबांच्या पश्चात प्रा. डॉ.पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांनी लाल बावटा कॅम्पवर माळेगाव यात्रेत परिषद आयोजित केली व त्या परिषदेत डॉ. भाई धोंडगे साहेबांच्या सामाजिक शैक्षणिक व राजकीय कार्याची गौरव परिषद आयोजित आयोजित केली या परिषदेसाठी भाई गुरुनाथरावजी कुरूडे साहेब यांनी मार्गदर्शन केले. भाईंचे निष्ठावंत सहकारी कार्यकर्ते भावपूर्ण श्रद्धांजली मार्गदर्शनाखाली असे नाव देऊन भाईंच्या काळातील निष्ठावंत कार्यकर्ते भाई गंगाराम पाटील कल्याणकर गोगदरी यांना अध्यक्षपद दिले तर उद्घाटक म्हणून भाई च्या प्रत्येक चळवळीचे साक्षीदार असणारे व्ही.जी.चव्हाण सर होते .या परिषदेला प्रमुख पाहुणे भाई आनंदराव पाटलांचे चिरंजीव बाबूराव राव पाटील शिंदे दाताळकर होते .यावेळी प्राचार्य डॉ.अशोकरावजी गवते सरांनी आपल्या प्रास्ताविकात साहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांचा वारसा खऱ्या अर्थाने पुरुषोत्तमरावच चालवतील असा विश्वास व्यक्त केला .भाई धोंडगे साहेबांना मरणोत्तर तरी पद्मविभूषण पदवी देऊन सन्मानित करा असा ठराव मांडला उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून पाठिंबा दिला प्रा. डॉ. पुरुषोत्तमराव साहेब यांनी माळेगाव खंडेरायाची यात्रा वाढवण्यासाठी केलेले सत्याग्रह सर्वसामान्य भक्तांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र विधानसभेत भांडून केलेले प्रयत्न विस्तृतरूपात मांडताना आजही यात्रेकरूंना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यात्रेत नाही मायमाऊलांना आंघोळीसाठी बाथरूम साठी आजही व्यवस्था नाही आमची लाज वेशीवर टांगण्याचा विचार शासनाचा आहे का? सवाल केला आजही खऱ्या कलावंतांना मानधन नाही पालखीचे खरे मानकरी असलेल्या बेरळी तालुका लोहा येथील नाईक घराण्याला मानधन मिळत नाही. याची नोंद शासनाने घ्यावी. अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला. पुढे बोलताना भाई केशवराव धोंडगे साहेबांनी सर्व नाही रे वाल्यांना हक्काचं गुराखी पीठ निर्माण करून दिलं व आयुष्यभर त्यांच्यासाठी लढले झगडले त्याचप्रमाणे मीही नाही रे वाल्यांच्या बाजूने उभारून भाईंचा वारसा आयुष्यभर चालवणार असा विश्वास उपस्थित सर्व सालदार राजे गुराखीराजे लोक कलावंत यांना दिला .यावेळी सर्वजण होती भारावून गेले .व या परिषदेचे प्रमुख पाहुणे बाबुराव पाटील शिंदे दाताळकरांनी भाई धोंडगे साहेबांच्या कार्याचा आढावा घेताना मन्याड खोऱ्याचा वाघ फक्त केशवरावच होते. आमच्या वडिलांच्या एकनिष्ठतेचे साक्ष आहे. पुरुषोत्तमराव यांनी आम्हाला हा सन्मान करून दिल्याचे समाधान व्यक्त केले परिषदेचे उद्घाटक चव्हाण व्ही.जी.सरांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात भाईच्या कार्याचा आढावा घेताना प्रति केशवराव म्हणून पुरुषोत्तमराव नाही रे वाल्यांचे खरे कैवारी असल्याचा विश्वास व्यक्त केला पुरुषोत्तमराव यांनी “भाऊचा डब्बा ” या माध्यमाने गोरगरीब व गरजवंत व सरकारी रुग्णालयात रुग्णांना डबे देवून अन्नछत्र सुरू करून 1000 दिवस झाल्याचे सांगून त्यांच्या कार्याचा गौरव प्राचार्य डॉ. सूर्यकांतराव जोगदंड यांनी देखील केला . परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सर्वांमध्ये घेतलेल्या ठरावाचे वाचन केले सकाळी 11:00 वाजता सुरू झालेल्या या परिषदेची दुपारी 1:00 वाजता सांगता झाली. या परिषदेचे सूत्रसंचालन माधवराव पेठकर यांनी केले. पोतराज, वाघ्या मुरळी ,देवकरीण गुराखी कलावंत, कलावंताच्या लोककला शाहीर प्रेम कुमार मस्के व त्यांचा संच यांनी दिवंगत भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब व डॉ. पुरुषोत्तमराव धोंडगे यांच्यावर गायलेले गीत परिषदेचे आकर्षण ठरले .यावेळी गुरूनाथराव पेठकर ,उत्तमराव भांगे, प्राचार्य धर्मापुरीकर, मुख्याध्यापक दिलीप बोधगिरे, उपमुख्याध्यापक बी.डी .जाधव, पर्यवेक्षक बी. आर. पाटील, शिंदे एच.जी., पर्यवेक्षक घोरबांड व्ही. आर., पाटील बी. जे., सूर्यवंशी एम .एस., ढगे एम.ए .,चव्हाण जी.डी .,धोंडगे एस. पी, सुधाकर कौशल्य. शेकडोच्या संख्येने खंडेरायाचे भाविक भक्तगण उपस्थित होते ही परिषद आता निरंतर चालू राहणार असल्याची भावना उपस्थित भाविक भक्ताकडून पहायला मिळत होती.

Previous articleजिल्हा परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे विमोचन
Next articleहरवलेल्या महिला व पुरुषाचा शोध घेण्याचे आवाहन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here