Home गुन्हेगारी हरवलेल्या महिला व पुरुषाचा शोध घेण्याचे आवाहन

हरवलेल्या महिला व पुरुषाचा शोध घेण्याचे आवाहन

183

आशाताई बच्छाव

IMG_20240112_172145.jpg

हरवलेल्या महिला व पुरुषाचा शोध घेण्याचे आवाहन

मालेगाव,(प्रविण क्षीरसागर प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क)-

कळवाडी ता. मालेगाव येथील दिपाली ललीत बागुल यांचे घरात पतीशी किरकोळ भांडण झाल्याने राहत्या घरातून लहान मुलगी कामेशवरी बागुल हीस सोबत घेऊन निघून गेली आहे. ती अद्याप पावेतो घरी परत आली नाही. सदर महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. नांव दिपाली ललीत बागुल, वय 26 वर्षे, उंची 5 फुट, रंग सावळा, चेहरा गोल, शरीर बांधा मध्यम, नाकात रिंग, अंगात काळया निळया रंगाची साडी, पायात निळया रंगाची चप्पल घातलेली, सोबत ग्रे रंगाची पर्स, पांढऱ्या रंगाची कपडयांनी भरलेली बॅग लहान मुलगी वय 9 महिने, अंगात पांढऱ्या रंगाचा फ्रॅाक, घातलेला आहे.
कळवाडी ता. मालेगाव येथील सागर राजेंद्र मरसाळ घरातून बॅन्ड वाजण्यासाठी जातो असे सांगून गेला असता तो अद्याप पावेतो घरी परत आला नाही. सदर पुरुषाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. नांव राजेंद्र मरसाळ, वय 25 वर्षे उंची 5 फुट, शरीर बांधा मध्यम, केस काळे, अंगात हिरव्या रंगाचा शर्ट, व निळया रंगाची जिन्स पॅन्ट व काळया रंगाचे जॅकेट छातीवर आई नांव गोंधलेले आहे. दोन्ही हरवलेल्या महिला व पुरुषाचा गाव परिसर तसेच नातेवाईक व इतर गाव परिसरात शोध घेतला असता अदयाप पावेतो मिळून आले नाहीत. अशा वर्णनाच्या महिला व पुरुषाबाबत माहिती असल्यास भ्रमणध्वनी क्रं. 9594901407 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मालेगाव तालुक्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Previous articleदिवंगत भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेबांचा व नाही रे वाल्यांचा वारसा आयुष्यभर चालवणार -प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे
Next articleशिवमहापुराण कथेस येणाऱ्या भाविकांना चाळीसगांव शहर पोलिसांचे आवाहन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.