Home जळगाव शिवमहापुराण कथेस येणाऱ्या भाविकांना चाळीसगांव शहर पोलिसांचे आवाहन

शिवमहापुराण कथेस येणाऱ्या भाविकांना चाळीसगांव शहर पोलिसांचे आवाहन

51
0

आशाताई बच्छाव

IMG_20240112_173433.jpg

शिवमहापुराण कथेस येणाऱ्या भाविकांना चाळीसगांव शहर पोलिसांचे आवाहन

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- दि 16 ते 20 जानेवारी दरम्यान चाळीसगाव येथे परमपूज्य पंडित श्री. प्रदिपजी मिश्रा (सिहोरवाले) यांच्या प्रभू श्रीराम महाशिवपुराण कथा चे आयोजन करण्यात आले आहे कथेस आलेल्या सर्व भाविकांना चाळीसगाव अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी आवाहन केले आहे.
कथा श्रवणा करीता येणाऱ्या महिला व पुरुष बांधवांनी मौल्यवान दागिने मोबाईल अथवा रोख रक्कम यांची कटाषाने काळजी घ्यावी, सोन्या चांदिचे दागिने घालुन येऊ नये,
महिलांनी मौल्यवान दागिने न घालता शक्यतो नकली दागिने चा वापर करावा,
वयस्कर व्यक्तींना नातेवाईक सांगुन हातातील अंगठी व गळ्यातील चैन काढुन दाखवु नका चोरीस जाण्याची शक्यता असते,
कपड्यावर घाण टाकुन आपले लक्ष विचलीत करून खिशातील पैसे व गळ्यातील दागिने चोरीस जाण्याची शक्यता असते,
एखादी व्यक्ती संशयास्पद वाटल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे,
वयोवृध्द इसमांना पोलीस असल्याचे सांगुण अंगावरील दागिने काढण्यास सांगुन चोरीचे प्रकार यापुर्वी घडलेले आहेत पोलीस कधीही अंगावरील दागिने काढुन घेण्यास सांगत नाहीत त्याबाबत नागरिकांनी सर्तक रहावे, येतांना व जातांना मोबाईल पैशाचे पाकीट पर्स लक्षपुर्वक सांभाळावे,
आपल्या आजुबाजुला संशयित वस्तु, संशयित इसम, महिला अथवा लहान बालके विना कारण रेगाळत असतांना आपल्या निर्दशनास आल्यास अथवा संशयित रित्या फिरतांना दिसल्यास तात्काळ पोलीस विभागाशी संपर्क साधावा,
शिवमहापुराण कथेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनाच्या पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली असुन भाविकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावी,
अनोळखी व्यक्तिकडुन कोणत्याही प्रकारचे खाद्य पदार्थ (प्रसाद) म्हणुन स्विकारू नका अथवा खाऊ नका त्यात गुंगीकारक औषध
असु शकते व आपली फसवणुक करण्याची शक्यता नाकारता येत नाही,
शिवमहापुराण कथेसाठी येणाऱ्या भाविकांनी शक्यतो लहान बालकांना सोबत आणणे टाळावे तसेच सदर महापुराण कथेबाबत डिजीटल प्रसार माध्यमांव्दारे प्रक्षेपण होणार असुन शक्य असल्यास त्याचा वापर करावा,
गर्दीच्या ठिकाणी शक्यतोवर जाणे टाळावे असे आवाहन चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन (०२५८९) २२०७७ डायल ११२ च्या वतीने सर्व अधिकारी व अंमलदार, गुन्हे शोध पथक यांनी केले आहे.

Previous articleहरवलेल्या महिला व पुरुषाचा शोध घेण्याचे आवाहन
Next articleचाळीसगाव महाविद्यालयामध्ये 38 व्या वक्तृत्व, वादविवाद आणि उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here