• Home
  • (भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज) देवळा -तालुक्यातील दोन रुग्णांचे कोरोणा अहवाल रविवार दिनांक दि 28 रोजी पॉझिटिव्ह

(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज) देवळा -तालुक्यातील दोन रुग्णांचे कोरोणा अहवाल रविवार दिनांक दि 28 रोजी पॉझिटिव्ह

(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
देवळा -तालुक्यातील दोन रुग्णांचे कोरोणा अहवाल रविवार दिनांक दि 28 रोजी पॉझिटिव्ह आल्यामुळे सोमवार दि 29 पासुन सलग तीन दिवस स्वयंस्फूर्तीने येथे जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे
गेल्या काही दिवसांपासून देवळा तालुका कोरोणामूक्त तालुका होता परंतु आज दोन रूग्ण कोरोणाबाधित असल्याचे अहवाल आल्याने देवळा तालुक्यातील नागरिक सतर्क झाले आहेत यातील एक रूग्ण 13 वर्षीय असून तो नाशिकस्थित आहे आईच्या मृत्यूने निराधार झाल्याने तो देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथे आपल्या मामांच्या गावी आला होता दुसर्‍याच दिवशी त्यांच्या आईचा मृत्यू हा कोरोणाने झाल्याचा अहवाल येताच त्याचे मामा आजोबा आजी यांना कोरोणा केअर सेंटरमध्ये दाखल करत त्यांचे स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आले त्यात या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर दुसरा रूग्ण हा देवळा नगरपंचायतीचा कर्मचारी वय वर्षे 37 याचाही अहवाल पॉझिटीव्ह आल्याने देवळा शहरात खळबळ उडाली असून शहरात पहिल्यांदाच कोरोनाने शिरकाव केल्याने तात्काळ सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकञ येऊन सलग तीन दिवस जनता कर्फ्यु करण्याचे आवाहन करण्यात आले असून देवळा व खुंटेवाडी ही दोन्ही गावे कंटेन्मेट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत
बाइट:- डॉ सुभाष मांडगे तालुका वैद्यकिय अधिकारी

anews Banner

Leave A Comment