Home जळगाव चाळीसगाव महाविद्यालयामध्ये 38 व्या वक्तृत्व, वादविवाद आणि उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण...

चाळीसगाव महाविद्यालयामध्ये 38 व्या वक्तृत्व, वादविवाद आणि उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न…

24
0

आशाताई बच्छाव

IMG_20240112_174035.jpg

चाळीसगाव महाविद्यालयामध्ये 38 व्या वक्तृत्व, वादविवाद आणि उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न…

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील-
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे भागीरथीबाई पूर्णपात्रे कला, सीताबाई मांगीलाल अग्रवाल विज्ञान आणि कस्तुरबाई खंडू चौधरी वाणिज्य महाविद्यालय आणि केशव रामभाऊ कोतकर कनिष्ठ महाविद्यालय चाळीसगाव आयोजित व श्रीमती सीताबाई अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट, श्रीमती शकुंतलाबाई अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉ. पूर्णपात्रे चॅरिटेबल ट्रस्ट चाळीसगाव यांच्या आर्थिक सहकार्याने
संपन्न होत असलेल्या 38 व्या कै. गोपाळ नारायण उपाख्य भैय्यासाहेब पूर्णपात्रे स्मृती करंडक वक्तृत्व, श्रीमती सीताबाई मांगीलाल अग्रवाल स्मृती करंडक वादविवाद आणि नारायणभाऊ अग्रवाल गौरवार्थ करंडक उत्स्फूर्त वक्तृत्व राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धाचे पारितोषिक वितरण दि. 11 जानेवारी 2024 रोजी दुपारी 4 वाजता प्राचार्य डॉ. एन. एन.गायकवाड (रजनीताई पाटील महाविद्यालय भडगाव), संदीप पाटील (पोलीस निरीक्षक चाळीसगाव) यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आर. सी. पाटील होते.
प्रसिद्ध उद्योजक सुशिलभाऊ अग्रवाल डॉ. गणेश मोहिते यांनी परीक्षकाचे मनोगत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर यांनी केले प्रास्ताविक स्पर्धा संयोजक डॉ. वीरा राठोड यांनी केले.
स्पर्धाचा निकाल पुढीलप्रमाणे :-
पूर्णपात्रे स्मृती करंडक वक्तृत्व स्पर्धा :-
सांघिक चषक – मंथन कुमावत आणि मयुरी सोमवंशी बी पी आर्ट्स एस एम ए सायन्स अँड के के सी कॉमर्स कॉलेज चाळीसगाव,
प्रथम – कु. श्रुती अशोक बोरस्ते (एच पी टी कॉलेज नाशिक ), द्वितीय – धर्मेश हिरे ( विद्यावर्धिनी कॉलेज चाळीसगाव ), तृतीय – यश पाटील (बी के बिर्ला कॉलेज मुंबई ),
सीताबाई अग्रवाल स्मृती करंडक वादविवाद स्पर्धा :-
सांघिक चषक :- कु. ऐश्वर्या तनपुरे आणि सौरभ औटे, माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर,
प्रथम – यश पाटील ( बी के बिर्ला कॉलेज मुंबई ), द्वितीय – ऐश्वर्या तनपुरे, माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर,
तृतीय – धर्मेश हिरे,
नारायणभाऊ अग्रवाल गौरवार्थ उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा :-
सांघिक चषक – रामेश्वर राठोड आणि कु. पुजा माळी, राष्ट्रीय कॉलेज चाळीसगाव,
प्रथम – यश पाटील व धर्मेश हिरे विभागून द्वितीय – मंथन कुमावत, बी पी आर्ट्स एस एम ए सायन्स अँड के के सी कॉमर्स कॉलेज चाळीसगाव,
तृतीय – रामेश्वर राठोड, राष्ट्रीय महाविद्यालय चाळीसगाव यांनी पटकावले.
कार्यक्रमास उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर (सहसचिव चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी.) सुरेश स्वार (चेअरमन सीनियर कॉलेज कमिटी), सुशील अग्रवाल (प्रायोजक शकुंतलाबाई अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट.), ज्येष्ठ संचालक एड. प्रदीप अहिरराव आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण सुनील पाटील (PRO क. ब. चौ. उ. म. वि. जळगाव), डॉ. गणेश मोहिते (देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद), डॉ. रमेश औताडे (सोयगाव महाविद्यालय), डॉ. पंकज नन्नावरे यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. मनिषा सूर्यवंशी, प्रा. रवी पाटील यांनी केले तर आभार उपप्राचार्या डॉ. कला खापर्डे यांनी केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डी. एल. वसईकर, उपप्राचार्य प्रा. ए. आर. मगर, कार्यालयीन अधीक्षक श्री हिम्मत आंदोरे, चाळीसगाव नगरितील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव प्राध्यापक, विध्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Previous articleशिवमहापुराण कथेस येणाऱ्या भाविकांना चाळीसगांव शहर पोलिसांचे आवाहन
Next articleके. के. वाघ चांदोरी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न—
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here