Home नाशिक के. के. वाघ चांदोरी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त...

के. के. वाघ चांदोरी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न—

44
0

आशाताई बच्छाव

IMG_20240112_175017.jpg

के. के. वाघ चांदोरी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न—

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती आणि युवा सप्ताह निमित्ताने के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी ता. निफाड जि. नाशिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रेड रिबीन क्लब व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी ता. निफाड जि. नाशिक येथे शुक्रवार दि. १२/०१/२०२४ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. सदर शिबिर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांनी रक्तादात्यांना रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले व महाविद्यालय हे सातत्याने दरवर्षी हे शिबीर घेत असल्याचे सांगितले.

जनकल्याण रक्तकेंद्, नाशिकचे जनसंपर्क अधिकारी श्री प्रदीप देशमुख यांनी त्यांची टीम या शिबिरासाठी आणली होती. यावेळी देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, एक पिशवी रक्तदानाने तीन व्यक्तींचे प्राण वाचते. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून जो असतो सशक्त तोच रक्त देवू शकतो म्हणून प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे.

महाविद्यालयाचे रा से. यो. कार्यक्रम अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व स्वयंसेवक यांच्या प्रयत्नाने हे शिबिर यशस्वी झाले. शिबिरात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक तसेच शिक्षक प्रा. पी. पी. आहेर, प्रा. आर. बी. पोटे, प्रा. ए. एस. खालकर, प्रा. बी. बी कोल्हे, प्रा . एस. एस. मोगल, श्री व्ही. एम. कुशारे व शिक्षकेतर कर्मचारी यांसह ४३ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबिरासाठी के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री समीर दादा वाघ, विश्वस्त श्री चांगदेव दादा होळकर, संचालक श्री अजिंक्य दादा वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी, वरिष्ठ महाविद्यालये समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर रक्तदान शिबिरास उपप्राचार्या डॉ. एस. जी. सावंत, उपप्राचार्य प्रा. पी. पी. आहेर, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. आर. बी. पोटे, प्रा. डी. एन. खैरनार, प्रा. एस. एम. सुरवाडे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. वाय. बी. आहेर, जिमखाना प्रमुख प्रा. बी. बी. कोल्हे व इतर शिक्षक उपस्थित होते. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी श्री कृष्णा शिंदे, श्री कुणाल निकम, श्री अक्षय हंस, श्री मनोज राऊत, श्री सागर बर्वे, श्रीमती मनीषा शिरसाठ, श्रीमती छाया दहितोंडे यांसह स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here