Home जालना सतीश घाटगेंनी दूर केला बापकळ गावातला अंधार चार दिवसात  गावात आले ट्रान्सफॉर्मर

सतीश घाटगेंनी दूर केला बापकळ गावातला अंधार चार दिवसात  गावात आले ट्रान्सफॉर्मर

44
0

आशाताई बच्छाव

IMG_20240112_175726.jpg

सतीश घाटगेंनी दूर केला बापकळ गावातला अंधार
चार दिवसात  गावात आले ट्रान्सफॉर्मर

(दिलीप बोंडे ब्युरो चीफ युवा मराठा न्यूज नेटवर्क)
जालना – तालुक्यातील बापकळ गावातील रोहीत्र जळाल्याने गावात अंधार पसरला होता. गावातील ही वीजेची अडचण भाजप नेते तथा समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी चार दिवसात सोडवली आहे. वीजेचा प्रश्न मार्गी लागल्याने गावकऱ्यांनी सतीश घाटगे यांचे आभार मानले.
बापकळ गावातील रोहीत्र जळाल्याने गावकऱ्यांची गैरसोय होत होती. सतीश घाटगे सांत्वनभेटीसाठी गावात आले असता गावकऱ्यांनी त्यांना वीजेची अडचण सांगितली होती. सतीश घाटगे यांनी चार दिवसात नवीन ट्रान्सफॉर्मर देण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार अधिकाऱ्यांनी गुरुवारी गावात ट्रान्सफॉर्मर पाठवून बसवले. त्यामुळे गावाचा अंधार दूर झाला. यंत्रणा हलवून गावकऱ्यांची अडचण दूर केल्याबद्दल गावकऱ्यांनी सतीश घाटगे यांचे आभार मानले. गावच्या रोहीत्रासाठी गणपत  जाधव,  सचिन  सावंत, पुंजाराम  सावंत,  सुरेश  कांबळे, देविदास  जाधव आदींनी प्रयत्न केले.
——————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here