• Home
  • 🛑 आंबेगाव तालुक्यात कोरोना बाधित रूग्णांसाठी एक हजार बेडची व्यवस्था…! 🛑

🛑 आंबेगाव तालुक्यात कोरोना बाधित रूग्णांसाठी एक हजार बेडची व्यवस्था…! 🛑

🛑 आंबेगाव तालुक्यात कोरोना बाधित रूग्णांसाठी एक हजार बेडची व्यवस्था…! 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

आंबेगाव/पुणे:⭕आंबेगाव तालुक्यात कोरोना बाधित रूग्णांसाठी एक हजार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पीटल मंचर येथे लक्षणे असलेले कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण ठेवले जाणार आहेत तर शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरी खुर्द येथे लक्षणे नसलेले कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यापुर्वी कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांवर तालुक्यातच उपचार होत होते मात्र आता गंभीर कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांवर देखिल तालुक्यातच उपचार होणार आहेत. यासाठी तज्ञ डॉक्टर, कर्मचारी, व्हेंटिलेटर, आॅक्सिजन याची देखिल व्यवस्था करण्यात आली आहे.

भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पीटल मंचर येׅथे तयार करण्यात आलेल्या समर्पित कोविड रूग्णालय व शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरी खुर्द येथील कोविड आरोग्य केंद्र याची पहाणी व उद्घाटन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सांगलीचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांच्या उपस्थितीत आज दि.१९ रोजी करण्यात आले.

यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पुणे जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, पंचायत समितीचे उपसभापती संतोष भोर, अवसरी खुर्दच्या सरपंच संगिताताई शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे, पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदिप पवार, डॉ.फडतरे, डॉ.सुनिल खिंवसरा, डॉ.नरेंद्र लोहकरे, डॉ.विनायक खेडकर, सहसंचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, पुणे

तथा शासकीय तंत्र निकेतन अवसरी खुर्द चे प्राचार्य डॉ.दिलीप रामचंद्र नंदनवार , अवसरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ.अविनाश शिवराज पंत प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment